शेगांव : तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जोरदार पाऊस पडल्याने शेगांव तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. जवळा पळसखेड येथे शेतनाल्यावर आंघोळीसाठी गेलेला १८ वर्षीय युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे. शेगाव तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

मुसळधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील सार्वत्रिक भागामध्ये नदी-नाल्यांना पुर आला आहे. बाळापुर रोडवर असलेल्या जवळा पळसखेड या गावात राहणारा आदित्य संतोष गवई वय १८ वर्षीय युवक त्याच्या मित्रांबरोबर गावातून वाहत असलेल्या शेत नाल्यावर पूर आल्याने आंघोळीसाठी गेला होता.

आंघोळी दरम्यान हा युवक त्याच्या मित्रांना तो पाण्यामध्ये डुबत असल्याचे लक्षात आले त्यांनी बराच वेळ त्या ठिकाणी शोध घेतला मात्र तो वाहून गेला. परिसरातील नागरिक त्याठिकाणी त्या नाल्याच्या पाण्यामध्ये त्या वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेत आहेत.

या घटनेची माहिती शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविण्यात आली असून घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल अरुण मेटांगे पोलीस नायक कॉन्स्टेबल प्रवीण ईतवारे हे दाखल झालेले आहेत. अजुनपर्यंत ही वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागला नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.