शेगांव : येथील माऊली डायलेसीस आणि हार्ट केअर सेंटर मध्ये एका वयोवृद्ध इसमावर Abdominal Aorta Mycotic Aneurysm repair ची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. अकोल्यातील हे ६३ वर्षीय वयोवृद्ध गृहस्थ यांना ५ दिवसांआधी Mycotic Aneurysm of Abdominal Aorta (पोटातील मोठ्या रक्त वाहिनी चा जंतु संसर्गाने फुगा तयार होऊन फाटली) असल्याचे निदान झाले.अकोल्यातील ज्या डॉक्टरां कडे त्या रुग्णाची ट्रीटमेंट सुरू होती. त्यांनी शेगांव मध्ये माऊली डायलेसीस आणि हार्ट केअर सेंटर येथे डॉ अंबरीश खटोड यांच्या कड़े शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. सदर पेशंटला २७ तारखेला माऊली हॉस्पिटल येथे भर्ती झाले आणि तातडीने 28 तारखेला त्यांची शस्त्रक्रिया तब्बल 7 तास, रात्री 12.30 वाजे पर्यंत चालली. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉ अंबरीश खटोड, डॉ अभिषेक भागवत, डॉ निलेश कोरडे, डॉ प्रसाद टाले, डॉ विजय जैस्वाल, डॉ तुषार चरखा यांनी अथक परिश्रम घेतले.
previous post