नांदुरा : तालुक्यातील शेंबा खुर्द ग्रामपंचायतमधे निवडणूक न घेता विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ग्रामपंचायतीला 25 लाखाचा निधी मिळणार आहे. मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांनी गावात एकोपा राहावा, गावाचा विकास जलद गतीने व्हावा, गावकरी गुण्या गोविंदाने राहावे,या अनुषंगाने मतदार संघातील जी ग्रामपंचायत विरोध होईल त्या ग्रामपंचायतीस एका वर्षात 25 लक्ष रुपये विकास निधी देण्याची घोषणा केली होती. आमदार राजेश एकडे यांच्या संकल्पनेला साथ देत नांदुरा तालुक्यातील काँग्रेस पक्षाची शेंबा खुर्द ग्रामपंचायत अविरोध झालेली आहे. त्यामुळे शेंबा खुर्द ग्रामपंचायत 25 लक्ष रुपये विकास निधीची मानकरी ठरली आहे. शेंबा खुर्द ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाच्या वंदना पुरुषोत्तम पाटील, विजया संतोष पाटील, मुक्ता जीवन, पाटील दिपक, देवीदास पाटील माधुरी सुभाष दाभाडे, रमाबाई विद्याधर दाभाडे,हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून अविरोध निवडून आले आहे. शेंबा खुर्द ग्रामपंचायत विरोध निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनिल पाटील, राजू पाटील, रमेश पाटील, श्रीराम पाटील, गोविंदा पाटील व त्यांचे सहकारी सदस्य यांचे आमदार राजेश एकडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेंबा खुर्द गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
previous post