January 4, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा विविध लेख

शू्न्यातून विश्व निर्माण करणारे सतिषअप्पा दुडे

खामगांव : “निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचि फळ” सतिषअप्पा पांडूरंग दुडे यांचा दृढनिश्चय व आत्मविश्वासाच्या बळावर केलेला स्पेअर पार्ट दुकानदार ते एका यशस्वी दैनिकाचे व्यव्यस्थापक्ष, संपादक असा प्रवास पाहाताना या अभंगाची सत्यता पटते. अफाट जिद्दीची अचाट कष्टाची शून्यातून विश्वनिर्मिती करणारे हे शब्दप्रयोग आज सतिषअप्पांची ओळख बनले आहेत. समाजकारणाला पत्रकारिता व राजकारणाची जोड देत उज्वल भविष्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. मलकापूर तालुक्यातील पिंप्री गवळी हे त्यांचे मुळगाव. गरीब कुटुंबातील सतिषअप्पा दुडे यांचे वडील कामानिमित्त खामगावला राहायला आले. सतिषअप्पांनी स्पेअर पार्टच्या दुकानावर काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना २५ रुपये हप्ता मिळत असे. आधीपासून त्यांच्या वडिलांचा व्यापारीक दृष्टीकोन होता. त्या काळीही केवळ २५ रुपयात काहीच भागत नव्हते. त्यामुळे वडिलांच्या सल्ल्यावरून त्यांनी आठवडी बाजारात गुळाचा व्यापार सुरू केला. श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन संतनगरी शेगावमध्ये मंगळवारचा पहिला बाजार त्यांनी केला. या संपूर्ण दिवसात त्यांना १० रुपये १० पैसे नफा राहिला. त्यावेळी त्यांना हे कमविलेले पैसे खूप मोठी रक्कम वाटली. बैतुल, जालना, लातुर, उदगिर, मेंढक (आंध्रप्रदेश) येथून ट्रकने गुळाचा माल खरेदी करण्यास सुरुवात केली. जवळपास १९८२ ते १९९४ दरम्यान त्यांचा हा व्यवसाय सुरू होता. दरम्यान, त्यांच्या विविध सामाजिक कार्यामुळे त्यांचे स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्याशी संबंध जुळले. स्व.भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनात अनेक सामाजिक कामे हाती घेतली. काॅटनसिटी म्हणून ओळख असलेल्या खामगावात त्याकाळी मोठ्या प्रमाणात बैलगाड्या भरून कापूस विक्रीसाठी आणला जायचा. शेतकऱ्यांना चांगली सुविधा मिळावी व व्यापाऱ्यांपासून या शेतकऱ्यांची सुटका व्हावी याकरिता स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनात जिनिंग युनिट भाडेतत्वावर घेऊन सुरू केले. परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला. १९९८ पर्यंत म्हणजेच दोन वर्षे हे जिनिंग चालविले. त्यानंतर १९९९ ते २००२ पर्यंत प्रवासी वाहतूक व्यवसाय केला. २००२ पासून मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून व्यवसायास सुरुवात केली. नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी २००१ मध्ये जिल्ह्यातील पहिले सायंदैनिक प्रश्नकालची सूत्रे हाती घेतली आज हे दैनिक जिल्ह्यात लोकप्रिय आहे. या दैनिकाच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत.

समाजसेवेत अग्रेसर

सन १९८४ मध्ये वंदेमातरम मंडळाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून ते आजपर्यंत सतिषअप्पा दुडेंनी मंडळाचे सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सुरुवातीपासून सामाजिक कार्यात वंदेमातरम मंडळ अग्रेसर राहिले. १९९५ मध्ये मंडळाने स्वतःची रुग्णवाहिका आणली. ही रुग्णवाहिका नफा ना तोटा या तत्वावर चालविण्यात आली. मंडळाच्या माध्यमातून शवपेटी, स्वर्गरथ या सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या. अमंडळाचे सर्वेसर्वा मुन्नाभाऊ पुरवार, कोबुसिंग पोपली, अॅड. रमेश भट्टड, दिलीप गुप्ता यांच्यासह सर्व मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. १९९५ पासून आजपर्यंत वंदेमातरम रुग्णसेवा समितीचे अध्यक्ष म्हणून काम बघत आहेत.सामाजिक कामात सुद्धा ते अग्रेसर असतात. कोरोना काळात गरजूना मदत, सफाई कामगारांचा सत्कार, किट वाटप असे विविध उपक्रम त्यांनी राबविले. एक शिस्तप्रिय आणि विकासदृष्टी असलेले नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे.

सेवाभावाने राजकारणात


सतिषअप्पा दुडे यांच्या पाठिशी असलेल्या स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या आशिर्वादामुळे सेवाभावाने सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले. २००९-१४ मध्ये त्यांना बॅंकींग क्षेत्रात काम करण्याचा अनुभव मिळाला. स्व.भाऊसाहेब यांच्या माध्यमातून अप्पाजींनी खामगाव अर्बन बॅंकेची निवडणूक लढविली. यावेळी ते अविरोध निवडून आले. सतिषअप्पांमधील काम करण्याची जिद्द व प्रामाणिकपणा ओळखून स्व.भाऊसाहेब फुंडकर व आ.अॅड.आकाश फुंडकर यांनी २०१६ मध्ये नगरपरिषद निवडणुकीत खामगावातील हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळख असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मधून उमेदवारी दिली. अप्पाजींनीही त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवित पहिल्यांदाच चांगल्या मताधिक्याने विजय मिळविला. ऐवढेच नव्हे तर २०१६-१७ मध्ये त्यांची पाणीपुरवठा सभापती पदी निवड करण्यात आली. सद्यस्थितीत त्यांच्याकडे स्थायी समितीचे सदस्य पद आहे. असे विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असले तरी बुलडाणा जिल्ह्यात एक प्रामाणिक, निडर पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल खामगाव प्रेस क्लबच्यावतीने त्यांना स्व. बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्कार दिला जात आहे. त्यानिमित्त हार्दीक शुभेच्छा !
-श्रीधर ढगे पाटील
संपादक द रिपब्लिक महाराष्ट्र
9423237001 / 8920751175

Related posts

ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार : फडणवीस

nirbhid swarajya

चांदमारी येथे जुगारावर अडड्यावर धाड; चोर सोडून सन्यासाला फाशी

nirbhid swarajya

कपाशी पीक जळाल्याने शंभर टक्के नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी…

nirbhid swarajya
error: Content is protected !!