खामगाव: डिझायर कोचिंग क्लासेस वाडी खामगाव च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले असून श्रिनील मोहन बेलोकार हा राज्यात दहावा आदिनाथ ज्ञानेश्वर इंगळे राज्यात तेरावा तर आदित्य संतोष ठाकरे हा बुलढाणा जिल्ह्यात पहिला आला आहे. डिझायर कोचिंग क्लासेस वाडी खामगाव येथे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळत असून विद्यार्थ्यांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांना बसण्याची संधी मिळत आहे. बी.टेक.आयआयटी झालेले विवेक दामोदर दांडगे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी घडत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा २०२१-२२ मध्ये इयत्ता पाचवी व आठवीचे ८८ विद्यार्थी जिल्ह्यातून मेरिट आले आहेत. नवोदय मध्ये ११ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. डॉ. होमी भाभा इयत्ता सहावी व नववी मध्ये १७ विद्यार्थी सेकंड लेवल साठी पात्र तर एनएमटीसी मध्ये ३३ विद्यार्थी सेकंड लेव्हल साठी पात्र ठरले आहेत. डिझायर कोचिंग क्लासेसमध्ये जेईई/नीट फाउंडेशन,नवोदय,स्कॉलरशिप, डॉ.होमी भाभा, MTSE, NMTC, NMMS, गणित प्राविण्य व प्रज्ञा, ऑलिम्पियाड IMO, NSO, IEO, ISSO इत्यादी कोर्सेस उपलब्ध आहेत, सद्यस्थितीत दहावीची प्रवेश प्रक्रिया संपलेली असून वर्ग चौथी ते नववी पर्यंतचे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. डिझायर कोचिंग क्लासेसचे मार्गदर्शक डी.पी.दांडगे सर याची सुकन्या कु. ऐश्वर्या दामोदर दांडगे हिची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI नागपूर येथे निवड झाली आहे. ऐश्वर्या सध्या युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रावेर जिल्हा जळगांव खान्देश येथे कार्यरत आहे. तिला सागर अनासने सर व विवेक दांडगे सर यांचे मार्गदर्शन मिळाले.