खामगाव:मारोती कारने विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या इसमास खामगाव येथील शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत मदयसाठ्यासह चारचाकी देखील जप्त करण्यात आली.शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पोहेका .निलसिंग चव्हाण,नापोका संदीप टाकसाळ, संतोष वाघ,सागर भगत,देवेद्र शेळके,रवींद्र कन्नर यांनी केली आहे हे धुलीवंदनाच्या मध्यरात्री वाहन गस्त घालत होते. त्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून खामगाव ‘एमआयडीसी ‘ मधील महावितरण कार्यालया नजीक नाकेबंदी केली.यावेळी त्यांनी एम एच ०४ सीबी २२४० क्रमांकाच्या मारोती ८०० कारची झडती घेतली.कारवाईत १९७ विदेशी दारूच्या बॉटल्ससह चारचाकी वाहनसह असा एकूण ७३९८० रु माल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणी शेख समीर शेख जमीर( वय २३, राहणार रसुलपूर, तालुका नांदुरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकांनी केली आहे.