शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे करण्यात आले आवाहन
खामगाव : रजत नगरी म्हणून खामगावचा फार मोठा नावलौकिक आहे.व्यापाराच्या दृष्टीने खामगाव नगरीची भरभराट आहे.अनेक दृष्टीने खामगाव नगरी वैशिष्ट्यपुर्ण ठरली आहे.त्याचाच एक भाग म्हणजे खामगाव शिवाजीनगर येथील शिवभक्त कावड यात्रा व तानाजी व्यायाम शाळेच्या ऐतिहासिक दृष्ट्या या कावड यात्रेला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.तीन ते चार पिढ्यांची परंपरा या कावड यात्रेला असून आजतागायत ही परंपरा अखंड चालू आहे.पुर्वी तानाजी व्यायाम शाळेच्या नावाने निघणारी यात्रा ही कावड यात्रा आता मात्रा शिवभक्त आणि तानाजी व्यायाम शाळेच्या संयुक्त विद्यमाने निघत आहे.या कावड यात्रेचे वैशिष्ट्य असे की,दरवर्षी श्रावण महिन्यात अखंडितपणे ही कावड यात्रा गेल्या तीन ते चार पिढ्यापासून ही १०० किलोमीटरचे अंतर पार करत खामगाव येथून चांगदेव मुक्ताबाई ला जाते तेथून जल घेऊन कावड धारी परत खामगाव येथील सुटाळा बु येथील श्रीराम मंदिर येथे येत असते. तेथे कावळ भक्तांचा मुक्काम असतो.आध्यात्मिक दृष्ट्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्यादृष्टीने श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात कावडधारी वेगवेगळ्या ठिकाणी जावून दर्शन घेतात.त्यादृष्टीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा खामगाव येथील शिवभक्त मंडळ आणि तानाजी व्यायाम शाळा यांची संयुक्तस्वरूपाची कावड यात्रा २२ आँगष्ट रोजी चांगदेव मुक्ताबाई वरून रात्री सुटाळा बु येथील श्रीराम मंदिर येथे पोहचणार आहे.मंदिरात मुक्काम करून सकाळी खामगाव शहरातून वाजत गाजत मार्गक्रमण करत शिवाजीनगर भागातील ओंकारेश्वर मंदिरामधील महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक करण्यात येणार आहे.त्यासाठी सर्व शिवभक्तांनी सकाळी १० वाजता सुटाळा बु येथील श्रीराम मंदिर येथे उपस्थित राहण्याचे आवाहान शिवभक्त कावळ यात्रा मंडळ व तानाजी व्यायाम शाळा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सागर बेटवाल यांनी दिली आहे