April 19, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

शिवाजीनगर पोलिसांनी गुटखा पकडला

खामगांव : फरशी चौकातून दुचाकिवरून गुटखा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून आज फरशी येथून दुचाकी क्रमांक एम एच-२८-ए एम-४०४१ वरून सूर्यकांत विजयकुमार पुरवार वय ५२ रा. सराफा याने जीवितास अपायकारक असा व संसर्ग पसरविण्यास कारणीभूत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटखा घेऊन जाताना शिवाजीनगर पोलिसांना मिळून आला त्याच्या जवळील व घरातील झडती घेतली असता त्यामधे विमल पान मसाला कंपनीचा प्रतिबंधीत गुटखा व इतर गुटखा, मोटारसायकल सह असा एकूण ८०११० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाळकृष्ण फुंडकर यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सूर्यकांत पुरवार विरुद्ध भादवि कलम १८८,२६९,२७०,२७२,२७३ भादवी सह अन्न सुरक्षा कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक , हेमराजसिंह राजपूत अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव ,अमोल कोळी उपविभागीय पोलिस अधिकारी खामगाव यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील हुड यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज खूंटे, पो ना देवेंद्र शेळके,पो ना संदीप टाकसाळ, पो कॉ रवींद्र कन्नर, पो कॉ बाळकृष्ण फुंडकर, पो कॉ सागर भगत यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाचे अन्न व प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मागणी केली होती की गुटखा विक्री करणाऱ्यांना जामीन मिळू नये,आणि गुटखा विक्रिचे केंद्रबिंदु असलेल्या खामगाव मध्ये अनेक वेळा गुटखा पकडण्यात आला आहे. यावरून एकच लक्षात येते की पालकमंत्री डॉ.शिंगणे यांच्या जिल्ह्यातच अवैधरीत्या गुटखा विक्री जोमात सुरू आहे. गुटखा विक्री करणाऱ्यांवर नेमके अभय कोणाचे अशी चर्चा खामगाव मधील नागरिकांमध्ये सुरू आहे. व याकडे पालकमंत्री आता तरी पूर्ण गांभीर्याने लक्ष देतील का हे पाहावे लागणार आहे.

Related posts

ज्ञानगंगा अभयारण्यात C-1 वाघासह वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार

nirbhid swarajya

खामगाव मध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा…

nirbhid swarajya

ओटीपी देणे पडले महागात

nirbhid swarajya
error: Content is protected !!