January 6, 2025
खामगाव बुलडाणा विदर्भ

शिवांगी बेकर्स पारले कंपनीच्या मनसे कामगारांचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच

खामगाव शिवांगी बेकर्स कंपनी मधील कामगारांवर कंपनी संचालकांकडून अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अन्याय सुरू आहे तो अन्याय दुर व्हावा आनी कामगारांना त्यांचा हक्क मिळावा या करीता कामगारांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद स्विकारले आहे त्यानुसार कंपनी संचालकांशी वेळो वेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी संवाद साधत कामगारांवर अन्याय करु नका त्यांना त्यांचा हक्क द्या फक्त संवादच नाही तर संबंधित संचालका बरोबर लेखी पत्रव्यवहार केला परंतु सर्व प्रयत्न फेल ठरले मनसेचे सभासद स्विकारलेल्या कामगारांना कंपनीने त्रास देने सुरूच ठेवले अखेर कामगारांनी एकत्र येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात कंपनी काम बंद आंदोलनाची हाक दिल्यानंतर कामगार अधिकारी यांनी आंदोलक व कंपनी संचालक यांच्यात चर्चा घडवून आणण्याकरिता आंदोलनाच्या पाचव्या दिवशी दिनांक १४/१२/२०२१ ला कामगार अधिकारी आनंद राठोड बुलडाणा यांनी संयुक्त बैठक आयोजित केली होती या बैठकीला कामगार व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

परंतु ऐनवेळी कंपनी मालकाने हेकेखोरपणा दाखवत संबंधित अधिकारी यांना आम्ही कामगारांसोबत चर्चेस तयार नसल्याचे पत्र देत पुन्हा एकदा कंपनी मालकाने त्याचा हेकेखोर पना दाखवून दिल्याने कामगार व कंपनी मालक यांच्यात चर्चा होऊ शकली नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कामगारांनी काल संध्याकाळी आंदोलन मंडपात मनसे पदाधिकारी प्रमुख नेते मंडळीच्या नेतृत्वात तातडीने बैठक घेत पुढील आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे सांगितले महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे नेते निलेश पाटील,अक्षय पनवेलकर,अक्षय परवडी,जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील शहराध्यक्ष आनंद गायगोळ,शहर उपाध्यक्ष आकाश पाटील अभिजित महानकर हे आंदोलन मंडपातील बैठकीत सहभागी झाले यावेळी कंपनीचे युनिट अध्यक्ष गोपाल चरखे, दिलीप गिठ्ठे,राम शिंदे,विशाल घोगले, मनोज लांडगे,प्रशांत सुरोशे, निलेश श्रीनाथ, गजानन घ्यार, भागवत ठाकरे,नितीन कोळसे, भरत वरघट, दीपक मोडकर,आकाश कोल्हे,राहुल येडे,दीपक वानखडे,प्रविण तायडे विलास वरघट सह मोठ्या संख्येने कामगारांची उपस्थित होती

शिवांगी बेकर्स कंपनीच्या कामगारांच्या प्रमुख मागण्या

२६ दिवसांचा कामाचा करारनामा करण्यात यावा, नियमानुसार कंपनीने किमान वेतन नुसार वेतन द्यावे,सर्व कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळालीच पाहिजे,ओव्हरटाईम चा मोबदला नियमानुसार मिळालाच पाहिजे,पगारावर पुर्ण बोनस मिळालाच पाहिजे,कामगारांना बेकायदेशीर नोटीसा देने बंद झाल्याच पाहिजे, सर्व कामगारांची पगार वाढ झालीच पाहिजे
,बेकायदेशीर गेट पास बंद झाल्याच पाहिजे
,कंपनी संचालकाकडुन कामगारांना देण्यात येणारा त्रास बंद झालाच पाहिजे,कामगारांचे कामाचे डिपार्टमेंट (विभाग) बदलवने थांबलेच पाहिजे अश्या विविध मागण्याकरीता आजपासून आंदोलन सुरू आहे

कंपनी कायमची बंद झाली त्याला कामगार नाही तर कंपनी मालकच जबाबदार शहर अध्यक्ष आनंद गायगोळ

कामगार अधिकारी आनंद राठोड बुलढाणा यांनी कामगार व मालक यांच्यात समेट घडवून आणन्या करिता दिनांक १४/१२/२०२१ रोजी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला कामगार उपस्थित राहीले पन कंपनी मालकाकडून संबंधित अधिका-यांना आम्ही कामगारांसोबत चर्चेस तयार नसल्याचे लेखी पत्र दिले या वेळी मालकाचा हेकेखोर पना दिसून आला जर भविष्यात कंपनी कायमची बंद झालीच आनी सहाशे कामगार बेरोजगार झाले तर याला संबंधित कंपनी संचालकच जबाबदार असतील कोणताही मार्ग हा चर्चेतुनच निघत असतो येवढेही कंपनी मालकाला समजत नाही तर तो मालक कंपनी कसा चालवत असेल याचा विचार कंपनी बद्दल सहानुभूती करणाऱ्यांनीही करायला पाहिजे

Related posts

जिल्ह्यात आज 97 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 18 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

दूरसंचार निगम मध्ये जिल्ह्यात उरले केवळ 48 कर्मचारी आणि दोन लाईनमन 91 कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती..

nirbhid swarajya

जिल्ह्यातील आज प्राप्त पाच रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

nirbhid swarajya
error: Content is protected !!