शेगाव . बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मेळावा शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेला असून या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे येणार असल्याची माहिती शिवसेनेचे बुलढाणा जिल्ह्यातील नेते यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे चिखली येथे सदर मेळावा आयोजित करण्यात आलेला असून दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या या मेळाव्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहण्याचे आवाहन श्री अविनाश दळवी यांनी केले आहे क्रीडा संकुल मैदान बस स्टँड जवळ हा मेळावा होणार असल्याचेही त्यांनी या पत्रकात स्पष्ट केले आहे