खामगाव: बुलढाणा विधानसभा आमदार संजय गायकवाड तुमचा मी मा उध्दवजींचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन व शिवसेनेचा खामंगाव शहर प्रमख विजय इंगळे म्हणुन जाहीर निषेध करतो.मीचं काय आज बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तुमचा निषेध सुरु आहे आणि तो निषेध करने हा प्रत्येक शिवसैनिकांचा आज शिवधार्य कर्तव्य आहे असे मी समजतो.आमदार संजय गायकवाड तुम्ही आमदार होण्याच्या आधी आपण एकाचं सामाजिक संघटनेत काम करायचो.जेव्हा तुम्ही छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हा प्रमुख होते तेव्हा मी एक शाखा प्रमुख म्हणून काम संघटनेत केले आहे आणि आज छावा मराठा युवा संघटनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करत आहे.आपल्या छावा संघटनेचे संस्थापक प्रमुख स्व.श्री देविदासजी वडजे सरांची शिकवण तुम्ही विसरले आहात.त्यांची शिकवण होती पिडीतांना न्याय मिळण्यास मदत करा.मग तुमचे माध्यम रस्त्यावरचे असो कि आँफिशीयल कागदोपत्री असो.आज आपल्या छावा संघटनेचे संस्थापक प्रमुख हयात नाही आणि असते तर त्यांनी ही तुमचा निषेधचं केला असता ही मला खात्री आहे.आक्रमकता मराठ्यांचा अलंकार आहे आणि आक्रमकता कुणावर दाखवा हा मराठ्यांच्या संस्काराचा भाग आहे.तुमची ख्याती अन्याया विरुद्ध आक्रमकता होती म्हणून छावा मराठा युवा संघटनेत आम्ही तुमच्या सोबत होतो व तुम्हाला आदर्श मानत होतो.पण तुम्ही आणि तुमच्या मुलाने केलेला कालचा आमच्या शिवसैनिकांच्या मेळाव्यातील प्रकार तुमच्या आयुष्यातील आता शेवटची खुप मोठी चुक आहे जी चुक कधीचं दुरुस्तं होवु शकत नाही.हिचं चुक तुम्हाला एका एका मताला मौताज करुन टाकेल.कालच्या आमच्या कार्यकर्ते व पद अधिकारी सत्कार मेळाव्यात ती सर्व वरीष्ठ मंडळी होती ज्यांनी तुम्हाला आमदार करण्यासाठी दिवसरात्र इमानेइतबारे काम केले.मा.छगन मेहत्रे साहेब,प्रा नरेंद्रदादा खेडेकर,मा दंत्ताभाऊ पाटील ,मा जालीदंर बुधवंत,मा वसंतरावजी भोजने,मा संजय दादा हाडे,कपीलदादा खेडेकर व इतर वरिष्ठ मंडळी.तुमचा मुलगा कुणाल तसा ही बुलढाणा शहरात गुंड म्हणुन प्रसिद्ध आहे.तो आणि तुम्ही पाठवलेले गावगुंड मेळाव्याच्या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी मेळाव्यातील खुर्च्या त्या मेळाव्यात बसलेल्या त्या बुलढाण्याच्या जेष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना मारल्या ज्यांनी तुम्हाला आमदार करण्यासाठी आपल्या रंक्ताचा गुलाल करुन तुम्हाला निवडणूकीत जिकंवले.शिवसेने मंध्ये येण्याच्या आधी तुम्ही किती पक्ष हुडकवुन आले हे जनतेला माहिती आहे.कधी राष्ट्रवादी काँग्रेस,तर कधी मनसे पण तुम्ही निवडून आले ते फक्त नी फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने व मा.पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरेंन यांच्या अशिर्वादाने व शिवसेना या नावाने.कालच्या मेळाव्यात आम्ही किमान पाचशे पद अधिकारी तिथं हजर होतो तुमच्या विस पंचवीस गुंडाचा भुगा करायला आम्हाला दोनचं मिनीट लागले असते पण आमचे संपर्क प्रमुख मा नरेंद्रदादा खेडेकर व वरिष्ठांनी शातंता ठेवण्याचे आव्हान निष्ठावंत शिवसैनिकांना सांगीतले ते आमच्या शिवसैनिकांचे संस्कार म्हणावे लागेल.तुमचा मुलगा कुणाल जेमतेम तिस वर्षाचा असेल आणि व्यासपीठावर बसलेले आमचे वरिष्ठ वयाने व कर्तुवाने तुमच्या पेक्षा ही मोठे आहेत.तुमच्या मुलाने त्यांच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला हेचं तुम्ही शिकवलेले संस्कार काय?तुम्हाला म्हणे गंद्दार म्हणन्याची चिडं आहे.मला गंद्दार म्हणाले म्हणुन आमचे कार्यकर्ते चिडले अशी तुमची पहिली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना तुम्ही दिली.अरे आहेचं की तुम्ही गंद्दार.सतरा पक्ष हुडकून आलेले तुम्ही.तुम्हाला शिवसैनिक,शिवसेना व मा पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेबांनी तुम्हाला आमदार केले तुमच्या मनगटात ताकत असतीतर या आधी नसते आले का निवडून.आणि आजचे तुमची प्रसार माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया चुन चुन के मारेंगे अरे कुणाला आम्हाला मग तेव्हा आम्ही काय करत असु हा विचार केला का?तुमच्या पायाखालची वाळु तेव्हांच सरकली जेव्हा तुम्हाला आपल्या सोशल मीडीयावरील कमेंट बाँक्स बंद करावा लागला.तुमच्या दशहतला आता कुणी भीकं घालत नाही हे तुमच्या लक्षात पुर्णपणे आलेले आहे.तुमच्या बुलढाणा शहरात तुमची काय प्रतिमा झाली आहे ही कधी फेरफटका मारुन तपासा.तिथली सर्वसामान्य जनता सुध्दा तुमच्या व तुमच्या मुलाच्या त्रासाला,दादागीरीला कंटाळली आहे.ती जनता आज काहीचं बोलणार नाही पण मतपेटीतुन तुमची लायकी नंक्कीचं दाखवल्या शिवाय राहणार नाही.आणि शेवटचे एक सांगतो तुमची ही भाषा आहेना चुन चुनके मारेंगे,काट डालेंगे ती बदला हा देश हा महाराष्ट्र तथागत गौतम बुध्दांचा आहे ज्यांनी अंख्या देशाला शांतीचा,एकात्मतेचा संदेश दिला,हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे ज्यांनी अन्याया विरुद्ध लढण्याचे बळ सर्वसामान्य जनतेला दिलं.आणि आम्ही मेलेल्या आईचे दुध नाही पिलो कि तुमच्या गुंडागर्दि,दादागीरीला भिवुन जावु.सुरुवात तुम्ही केली याचा शेवट आम्ही करु असे म्हटले आहे.