एकही लढाई न हरणारा अद्वितीय योद्धा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वंशज वय वर्ष अवघे बत्तीस,शेकडो लढाया परंतु एकाही लढाईत पराजित न झालेला किंवा तह न करणारा राजा म्हणून ज्यांची संपूर्ण जगाने नोंद घेतली असे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती. पुरंदर किल्यावर १४ मे १६५७ रोजी जन्मलेल्या महाराजांना ११ मार्च १६८९ केवळ बत्तीस वर्षाचे आयुष्य लाभलेले छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण जगाचे दैवत आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रावर एक-दोन नव्हे तर तब्बल ३१ सरदार व दस्तुरखुद्द औरंगजेब चालून आला होता.औरंगजेबाच सैन्य पाच लाखांचं होतं अशावेळी या लाखाच्या सैन्यसागराला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तब्बल २७ वर्ष झुलवत ठेवत ‘सळो की पळो ‘करीत अद्वितीय शौर्य गाजवणारे व कधीही तह न करता सर्व लढाया जिंकणारे महापराक्रमी छत्रपती म्हणजे संभाजीमहाराज. अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती संभाजी महाराज उत्तम साहित्यिक,संस्कृतचे उत्तम जाणकार होते.संभाजी महाराजांचे अनेक भाषेवर प्रभुत्व होते संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ,तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले.आपले पिता शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी हा राज्यानितीशास्त्रपर रचला असावा.ग्रंथाचा सुरुवातीला शहाजीराजे,शिवाजीराजे यांची स्तुती आहे.एकूण तीन अध्याय आहेत यात राजनीती,राज्य व्यवस्था,कर्तव्ये,मंत्रिमंडळ इत्यादी प्रकरणे आहेत.संभाजी राजांनी शंभूराज,नृपशंभू,शंभूवर्मन या नावानी साहित्य निर्मिती केली या महान छत्रपतींना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या.त्यांचे संकृत दानपत्र प्रसिद्ध आहे,ब्रज भाषेतील सातसतक,नखशिख,नायिकाभेद हे ग्रंथ उपलब्ध आहेत.मुंबई विकत घेण्याच्या संबंधीचा पूर्ण व्यवहार हा इंग्रजीतून संभाजीराजांनी केलेला. बुधभूषण जगला प्रेरणा व्यसनाधीनाना सर्वांनूभूपती,परिवर्जता : सप्तदोषा सदाराज्ञा, हातच्या व्यसनोदया : बुधभूषण ग्रंथाचे लेखन शंभूराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी केली.राजकारण धुरंधर संभाजी महाराज संस्क्रूतमध्ये ग्रंथ लिहितात यावरुनच ते सुसंस्क्रूत,उच्च शिक्षित होते हे स्पष्ट होते.सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेले ज्ञानेश्वर महाराज आमची प्रेरणा आहेत पण चौदाव्या वर्षी बुधभूषण लिहिणारे संभाजीराजे अभ्यासक्रमातून जगभरात शिकवणे फार महत्वाचे आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास जगापुढे आणण्यासाठी मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेडसह अनेक सामाजिक संस्थां,संघटनांनी पुढाकार घेतला आहे.डॉ. प्रभाकर ताकवले यांनी केलेला बुधभूषणचा अनुवाद असेल किंवा जेष्ठ साहित्यिक शरद गोरे यांनी केलेला कवितारुपी अनुवाद असेल सर्व साहित्यिकांचे योगदान आहे.तसेच देशभरात गावोगावी जाऊन आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास लोकांपुढे मांडणारे अमोल मिटकरी,नितीन बानगुडे यांच्यासह अनेक व्याख्यात्यांचे प्रयत्न एक वेगळा विचार मांडणारे आहे. तू हार तरी न हरलेला,तुझा सद्गुणांनी तू तारलेला..आहेत कैक जगामध्ये गुणवंत,तुझ्यासारखा आहे तू भाग्यवंत..भाग्य लाभले तुला विसावया गळा,तुझ्याविना पोरका साऱ्या विश्वाचा सोहळा… संभाजी महाराजांचे कार्य अद्वितीय आहे ज्याला एखाद्या ग्रंथात किंवा कादंबरीत कधीही मांडता येणार नाही आयुष्यभर महाराष्ट्राची काका जगभरात पोहोचवणारे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यु मात्र नानाविध छळ करून औरंगजेबानी केला त्यामुळे ११ मार्च १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज या जगाला पोरके करून निघून गेले संभाजी महाराजांची प्रेरणादायी समाधी वढू बुद्रुक तुळापूर येथे आहे जेथे दरवर्षी लाखो लोक या विचारांना नमन करायला येतात. व पुरंदर किल्ल्यावर जन्मसोहळा साजरा होतो. संभाजी महाराजांच्या प्रेरणेने ‘मिटकरी’ आमदार अकोला जिल्ह्यातील अमोल मिटकरी यांनी शंभू चरित्राची प्रेरणा घेऊन देशभरात हजारो व्याख्याने केलीत. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडताना मिटकरी अनेकदा भावुक व्हायचेत, अक्षरशा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा लागायच्यात.अमोल मिटकरी सारखे शंभूचरित्र देशात कुणीही मांडत नाही याचे साक्षीदार प्रत्येक गाव आहे.आज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज व वडिलांच्या प्रेरणेने अमोल मिटकरी यांच्या नावापुढे आता ‘आमदार’ हे विशेषण लागणार असून संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी अमोल मिटकरी आमदार झालेत हा मोठा “योगायोग” म्हणता येईल..! –विशालराजे बोरे,अकोला ( दूरदर्शन व पिटीआय वृत्तप्रतिनिधी) |