November 21, 2025
जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

शिवजयंती साधेपणाने साजरी करावी – पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

बुलडाणा : समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांती प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य टिकून राहून प्रगती होते. तरी नवीन भरती होणाऱ्या पोलिसांनी ही बाब प्रकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सदैव तत्पर रहावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले. स्थानिक प्रभा सभागृह येथे अनुकंपा तत्वावर पोलीस शिपाई पदावर नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे आदी उपस्थित होते.आगामी येणारी शिवजयंती कोविड आजाराच्या पार्श्वभूमी वर साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन करीत पालकमंत्री म्हणाले, शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात यावी. याबाबत सर्वत्र जनजागृती करावी. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी प्रास्ताविक केले. संचलन पोलीस शिपाई निलेश रत्नपारखी यांनी तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

मोकाट कुत्र्यांना दिला अँन्टीरॅबिज् चा डोज

nirbhid swarajya

तरूणाई मध्ये महापुरूषांचे विचार रूजविण्यासाठी श्री तानाजी व्यायाम मंडळाचा नाट्यरूपी जीवंत देखावा

nirbhid swarajya

उद्यापासून बुलडाणा जिल्ह्यातील दारूची दुकाने होणार सुरू

nirbhid swarajya
error: Content is protected !!