खामगांव : बुलढाणा जिल्ह्यात आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०१९-२० मध्ये ९ लाख ८० हजार क्विंटल मका खरेदी झाला असून शासनाने या दिनांक २२ जुलै २०२० च्या पत्रान्वये जिल्ह्यात खरेदी झालेला आहे तो त्या जिल्ह्यात वाटपाबाबतचा सूचना सदर पत्रात करण्यात आलेले असून त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांनी आदेश काढून बुलढाणा जिल्ह्यातील प्राधान्य गात व अन्तोदय लाभार्थ्यांना गव्हाचे ऐवजी पूर्ण मका देण्याचे आदेश पारित केले असून जिल्ह्यातील १३ तालुक्यामध्ये मका वितरण करण्याबाबत सक्ती करण्यात आलेली आहे. सदरचे आदेश तत्काळ मागे घेण्यात येवून उपरोक्त लाभार्थ्यांना मका न देता गहू देण्यात यावे आणि मका हा तांदूळ ऐवजी दिल्यास हरकत नाही.जिल्ह्यात प्राधान्य गटातील १५ लाख २५ हजार लाभार्थी असून या लाभार्थ्यांना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आदेशाप्रमाणे प्रतिव्यक्ती तीन किलो प्रमाणे दरमहा ४६३०० क्वीटल मका वितरणासाठी लागणार असून अंत्योदय अन्न योजनेचे ६६००० लाभार्थी असून त्यांना प्रति किलोप्रमाणे १३२४० क्वीटल मका लागणार आहे वास्तविक पाहता अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत प्रत्येक व्यक्ती पाच किलो धान्य देणे सक्तीचे असून यात दोन किलो गहू, दोन किलो तांदूळ एक किलो भरड धान्य देणे अपेक्षित आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यात गव्हाएवजी पूर्ण तीन किलो मका देण्याबाबत आदेशित करण्यात आले असुन बुलढाणा जिल्ह्यातील खाद्यसंस्कृतीत मका बसत नाही आपल्या जिल्ह्यात मका पशुखाद्य म्हणून वापरण्यात येत आहे याकरिता आपल्या जिल्ह्यातील खरेदी झालेला मका इतर जिल्ह्यातील प्रतिव्यक्ती एक किलो प्रमाणे ज्या जिल्ह्यात खरेदी झाला नाही त्या जिल्ह्यात वाटपासाठी उपलब्ध करावा मागील वर्षी याच पद्धतीने राज्यात त्याचे वितरण झालेले आहे जिल्ह्यात राज्यात कोरोना महामारी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून शिधापत्रिकाधारकांना पोषणात गव्हाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे मक्याचे प्रमाण कमी करून दिल्यास काही हरकत नाही तसेच तांदूळ एवजी मका दिला तरी चालेल. तरी राज्य शासनाने गोरगरीब जनतेची चालवलेली थट्टा ताबडतोब थांबवावी व जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना गहूच देण्यात यावा व गव्हाएवजी मका न देता मका द्यायचच असेल तर तो तांदुळाचे एवजी द्यावा किंवा तांदुळाचे प्रमाण कमी करून द्यावा. गव्हा ऐवजी मका देणे हे अन्यायकारक असून बुलढाणा जिल्ह्यात दैनंदिन खाद्यपदार्थ म्हणून मक्याचा वापर करीत नाहीत. मग जे धान्य दैनदिन खाद्य म्हणून वापरात नाही तेच धान्य गोरगरीब जनतेला त्यांच्या गरिबीचा असहयातेचा फायदा घेत त्यांना देणे चुकीचे आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शिधा पत्रिकाधारकांना अशाप्रकारे त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना गव्हाऐवजी मका वाटप करणे हे अन्यायकारक आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा व तांदूळ ऐवजी मका वाटप करावे.कोणत्याही परिस्थितीत शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकेतून गहू वगळण्याचा प्रयत्न करू नये असेही आ.आकाश फुंडकर म्हणाले.