संग्रामपूर प्रतिनिधी :- जळगाव जा. तालुक्यातील खेर्डा येथील शिक्षित शेतकरी आशिष वस्तकार या अविवाहित शेतकऱ्याने संग्रामपूर येथील येथील एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि. 31 जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजता उघडकीस आली.सविस्तर असे की जळगाव जा. तालुक्यातील खेर्डा येथील शिक्षित शेतकरी आशिष मार्तंड वस्तकार या अविवाहित शेतकऱ्याने संग्रामपूर येथील 148 गट नंबर संग्रामपूर शिवारातील ओमु धूत याच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यांच्या पश्चात आई, वडील, 1 भाऊ 1 बहीण असा आप्त परिवार आहे.
मृतकाच्या खिश्यात होती प्रेस नोट
तीन दिवसां आधी त्याने एम टेक ची परीक्षा दिली, या आदी एमएससी, बीएड झाला आहे.
परंतु माझी फिल्ड चुकली असे पत्र लिहून खिश्यात ठेवले होते