April 19, 2025
अमरावती खामगाव जळगांव जामोद जिल्हा बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर विदर्भ शिक्षण शेगांव संग्रामपूर

शिक्षण विभागाला रिक्त पदांचे लागले ग्रहण गटशिक्षणाधिकारी सह शिक्षकांची 93 पदे रिक्त

संग्रामपूर प्रतिनिधी :- जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे आदिवासी बहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्यात तब्बल 93 पदे रिक्त आहेत त्यामध्ये उर्दू व मराठी माध्यमांचे मुख्याध्यापक व शिक्षकांची 83, गटशिक्षणाधिकारी 1, केंद्र प्रमुख 7, विस्तार अधिकारी 2, असे एकूण 93 पदे रिक्त असल्याने संग्रामपूर तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. तालुक्यात मराठी 91 शाळेवर 405 शिक्षकांची पदे मंजूर असून 352 कार्यरत असून 53 पदे रिक्त आहेत. आणि उर्दू 12 शाळेवर 79 पदे मंजूर असून 49 पदे कार्यरत असून 30 पदे रिक्त आहेत. मागील 9 महिन्यापासून गटशिक्षणाधिकारी यांचे सुध्दा पद रिक्त असल्यामुळे एका केंद्र प्रमुखाकडे प्रभार देण्यात आला असून 10 मंजूर केंद्र प्रमुख पदांपैकी 7 रिक्त आहेत तर 4 विस्तार अधिकारी पदे मंजूर असून 2 रिक्त आहेत असे एकूण 93 पदे रिक्त आहेत. एवढे नव्हे तर संग्रामपूर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये खोल्यांचा वानवा आहे त्यामुळे एकाच खोलीत तीन ते चार वर्ग भरावे लागत आहे त्यामुळे शिक्षक कोणत्या वर्गाला काय शिकवतात हे विद्यार्थ्यांला समजत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या अशी मागणी होत आहे. मागील काही वर्षांपासून . खारपानपट्ट्याचा शाप लागलेल्या आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता पहिली ते सातवी प्रयन्तच्या मराठी 91 व उर्दू 12 अशा एकूण 103 शाळा आहेत या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु इतर तालुक्याचे तुलनेत येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासह मूलभूत सुविधा देण्यात जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. परिणामी तालुक्यात खाजगी संस्थेचे पेव फुटले आहे काही महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील शिक्षकाच्या बदल्या केल्या आहेत परंतु त्या तुलनेत संग्रामपूर तालुक्यात शिक्षक देण्यात आले नाहीत. शिक्षकांची रिक्त पदे भरून वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात यावे या मागणीसाठी तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन केले आहे परंतु त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना न करता तात्पुरते शिक्षक देण्यात येत आहेत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी होत आहे.दर महिन्याला रिक्त पदांचा अहवाल जि प ला सादर करण्यात येते
तालुक्यात गटशिक्षणाधिकारी सह शिक्षकांची 93 पदे रिक्त आहेत. माझ्याकडे नोव्हेंबर 2021 पासून गटशिक्षणाधिकारी यांचा प्रभार असून दर महिन्याला जि प ला रिक्त पदांचा अहवाल सादर करण्यात येते.
वासुदेव ढगे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संग्रामपूर.
त्वरित रिक्त पदे न भरल्यास तीव्र आंदोलन
रिक्त पदांमुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात सापडले आहे.
संग्रामपूर तालुका हा आदिवासी तालुका असून या तालुक्यात गटशिक्षणाधिकारी सह शिक्षकांची 93 पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात सापडले असून त्वरित रिक्त पदे भरावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
मोहन पाटील, सामाजिक कार्यकर्ते

Related posts

लसीकरणातील गोंधळ नियंत्रणाबाहेर; नागरिकांचा संताप !

nirbhid swarajya

आग विझवितांना शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

nirbhid swarajya

मामानेच केला भाची वर लैंगिक अत्यचार; भीतीपोटी आरोपिची आत्महत्या

nirbhid swarajya
error: Content is protected !!