बुलढाणा:बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्यालय राहत असतील तर पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकाचे पूजन करावे असे आवाहन आ.बंब यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.मागील काही दिवसा पूर्वी अधिवेशनामध्ये आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते की काही शिक्षक मुख्यालयीन राहत नाहीत शहरांमध्ये राहतात शिक्षक घर भाडे घेतात असा प्रश्न सुद्धा निर्माण केला होता.आता तर आमदार प्रशांत बंब यांनी एक पत्रकच काढले की जे शिक्षिका मुख्यालय राहत असतील त्यांची पूजा करावी व जे मुख्यालय राहत नसतील तर आमदार प्रशांत बंब यांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर शिक्षकाचे नाव कोणत्या शाळेत शिक्षक आहे त्या गावचे नाव बंब यांच्या ई-मेल आयडीवर पाठवावे अश्या प्रकारचे आव्हान बंब यांनी केले आहे.जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील जि.प शाळे ची परिस्थितीत फार गंभीर एकतर शाळेतील पटसंख्या कमी सत्तर टक्के शिक्षक हे बाहेर गावी राहतात त्या शिक्षकांना मुख्यलय राहण्याची अडचण काय? विधानसभेत आमदार प्रशांत बंब यांनी प्रश्न उपस्थित केला होता.की काही कर्मचारीवर्ग घटनात्मक कायद्यानुसार मुख्यालय राहऊन काम करीत नाही.शिक्षक यांनी मुख्यालय राहुन शिक्षण दिलं पाहिजे.विद्यार्थी संख्या सुद्धा कमी याचे कारण शोधने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा शिक्षणाधिकारी व जिल्हा प्रशासनाने गरजेचे आहे.
अकोला अमरावती खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर मोताळा राजकीय लोणार विदर्भ शिक्षण शेगांव संग्रामपूर सिंदखेड राजा