हनी ट्रैप असल्याचा संशय
खामगाव: एका महिला शिक्षकेच्या त्रासाला कंटाळून ३२ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना १६ मे रोजी घडली. त्या इसमाच्या पत्नीच्या तक्रारिवरून महिला शिक्षकेच्या विरुद्ध जलंब पोलिसांनी गुन्हा दाखल करुन महिलेला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथून जवळ असलेल्या पहुरजीरा येथील प्रभुदास बोळे या ३२ वर्षीय विवाहित इसमाने १६ मे रोजी शेतात विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.त्याला तात्काळ येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृति चिंताजनक झाल्याने त्याला येथील खाजगी हॉस्पिटल मधे उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी उपचारा दरम्यान प्रभुदास बोळे वय ३२ याचा मृत्यु झाला. ह्या प्रकरणी खामगांव शहर पोलिसांनी मर्ग दाखल करुन सदर प्रकरण पहुरजीरा हद्दितील असल्याने जलंब पोलीस स्टेशन मधे वर्ग करण्यात आला होता. मात्र प्रभुदास बोळे आत्महत्येला वेगळे वळण लागले आहे. मृतक प्रभुदास बोळे पत्नीने पतीच्या शिक्षक मैत्रिणीविरुद्ध २४ मे रोजी जलंब पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमुद आहे की, त्यांचे पती प्रभुदास हे शेतकरी आहेत. त्यांचे पती आणि शिक्षिका शीतल घाटोळ यांची ओळख होती. शीतलच्या पतीचे निधन झाले आहे. ती आपल्या दोन मुलींसह अनिकट रोड सुटाळा खुर्द मधील स्वामीकृपा अपार्टमेंट, येथे राहते. ती नेहमी माझे पती यांना व्हिडिओ कॉल करायची व चॅटिंग करायची. माझ्या मागे कुणी नाही, मला फ्लॅट खरेदी करायला मदत करा,असे म्हणत ती नेहमी आमच्या घरी यायची व माझा पतीसोबत बोलायची. यावरून माझे पती आणि माझात वाद होत होते. शीतल फ्लॅट खरेदीसाठी माझे पती यांना पैसे मागायची, त्यामुळे माझे पती तणावात राहत होते. शीतल टॉर्चर करत असल्याने मला आत्महत्या करावीशी वाटत असल्याचे त्यांनी पत्नीजवळ बोलताना सांगितले होते. त्यानंतर १६ मे रोजी प्रभुदास जेवण करून चक्कर मारण्याकरिता शेतात गेले होते. मात्र रात्री उशीरा पर्यंत ते घरी न परतल्याने पत्नीने प्रभुदास यांना फोन केला असता तो फोन कैलास पारसकर यांनी उचलला प्रभुदास यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे सांगितले.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभुदास यांची पत्नी वर्षा हिने स्वतःचे व्हॉट्सऍप मेसेज चेक केले असता त्यात १६ मेच्या रात्री १०:३० वाजता प्रभुदास याने केलेले मॅसेज दिसले. त्यामध्ये प्रभुदास ने लिहिल होते की “वर्षा मला माफ कर…. मी तुला आयुष्यभराची साथ देण्याचे वचन दिले होते. पण मी माझे वचन पूर्ण करू शकलो नाही, माझी सिद्धी खूप भोळी आहे, तिची काळजी घेशील. माझ्या वेदुल्याकडे लक्ष दे….ती खूप गुणी मुलगी आहे. माझ्या मृत्युला शीतल घटाळे जबाबदार आहे. तिला सोडू नको.. सॉरी आई- बाबांची काळजी घे. यानंतर वर्षा हिने आपले पती प्रभूदास यांचा मोबाइल चालू केला असता त्यात शीतल घटाळे हिचे मॅसेज होते. यामध्ये तिने माझ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील.….मी येईल विचारायला…. फोन स्वीच ऑफ करून माझी अवस्था बदलणार नाही, आणखी बिघडेल…. असे मॅसेज होते. असे प्रभुदास बोळे यांची पत्नी वर्षा बोळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शीतल घटाळे ही प्रभुदास बोळे यांना भेटून, फोनवरून टॉर्चर करत होती त्यामुळे माझा पतीने आत्महत्या केली असल्याचे वर्षा बोळे हिने सांगितले आहे. तिने दिलेल्या तक्रारिवरून जलंब पोलिसांनी शिक्षिका शीतल घटोळ हिच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षकेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर दुसऱ्या सुनावनी मधे तीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ह्या सर्व प्रकरणात हनी ट्रैपिंग सारखा प्रकार झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हनी ट्रैपिंग सारखे अनेक प्रकार जिल्ह्यात वाढले असल्यास बोलल्या जात आहेत त्यामुळे या प्रकरणाला क़ाय वळण मिळते हे पहावे लागेल. पुढील तपास जलंब पोलीस करत आहेत.अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी दिली आहे