जळगाव जा. : संग्रामपुर तालुक्यातील आदिवासी बहुल हळ्यामाल येथील जि प मराठी शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या 38 वर्षीय शिक्षकाने वरवट बकाल एकलारा रस्त्यावरील शेतातील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव संतोष रामदास खोरणे असुन मेहकर तालुक्यातील आरेगाव येथील रहवासी आहे तर ह.मु. वरवट बकाल असुन वरवट बकाल येथुन आदिवासी बहुल गाव हळयामाल येथील शाळेत ते ये-जा करित होते तर कोरोनाच्या पाश्वभुमिवर लॉक डाऊन काळात तंत्रस्नेहि म्हणुन शिक्षक खोरणे हे विद्यार्थीना ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन प्रवेश प्रक्रिया व शालेय कामकाज निमित्त सदर शिक्षक वरवट बकाल येथे मुक्कामी होते. त्यांनी वरवट बकाल एकलारा रोड लगत शेतातील झाडा ला गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या घटना स्थळी पोलीसांनी भेट देऊन पंचनामा केला सदर शिक्षकाने आत्महत्या का केली याचे कारण समजु शकले नाही त्याच्या पश्चात पत्नी व 2 मुले आहेत.