खामगाव : कोरोना व्हायरसचा परिणाम देशातील प्रत्येक भागात झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक प्रशासनामार्फत करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अश्यातच दिव्यांग लोकांकडे आज दिनांक 4 मार्च रोजी मा.समाज कल्याण विभाग बुलडाणा यांच्या सुचने नुसार स्थानीक श्रीराम एज्युकेशन सोसायटी, खामगांव द्वारा संचालित निवासी मूक व बधिर विदयालय खामगांव येथिल शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी खामगांव परिसरातील हालचाल न करु शकणाचा दिव्यांगाना कोरोना पासुन बचाव करण्या करीता हॅन्डवॉश सॅनेटाईजर व मास्क चे वितरण करण्यात आले.
सदर वितरण हे हालचाल न करू शकणाऱ्या दिव्यांगांच्या घरपोच देण्यात आले व वाटप करतांना शासनाच्या निर्देशांचे पालन करण्यात आले. दिव्यांगांना जे आवश्यक आहे ते साहित्य दिले जात आहे. त्याचा व्यवस्थित वापर करावा असेही यावेळी शिक्षकांनी त्यांना सांगितले. दिव्यांगाना अनंत अडी-अडचणी येतात. हे साहित्य मिळाल्यावर त्यांना फायदा होणार आहे. दिव्यांगाना साहित्य मिळाल्यावर त्यांच्या चेह-यावरील समाधान पाहून अतिशय आनंद झाला. त्यांच्या चेह-यावर हास्य फुलवू शकलो ह्याचे समाधान वाटले असे त्यांनी सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी.दिपक अग्रवाल,वाचा उपचार तज्ञ श्री डॉ. प्रकाश जगताप ,शिक्षकेतर कर्मचारी श्री राजेश राठी, शिक्षक अशोक सपकाळ व अमित देशपांडे यांची उपस्थीती होती.