खामगाव : एचआयव्ही निर्मूलनासाठी शासनाने केलेल्या उपाय योजनांमुळे एचआयव्ही ग्रस्त गर्भवती मातांची वेळीच तपासणी होऊ शकली .त्यामुळेच गत दोन वर्षांपासून बुलडाणा जिल्यात एकही एचआयव्ही ग्रस्त बालक जन्मला आला नसल्याचे दिसून येत आहे. एचआयव्ही एड्स नियंत्रणासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रणासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मार्फत शहरी तसेच ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारच्या उपाय योजना राबविल्या जात आहेत.प्रामुख्याने गर्भवती मातांपासून बालकांना होणार आजार टाळण्यासाठी 2002 पासून विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे त्यामुळे एड्स सारख्या घटक रोगा पासून वाचणे शक्य आहे हे लोकांना समजावून सांगण्यात आले . पीपीटीसीटी कार्यक्रमा अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर अकोला , बुलढाणा ,वाशीम ,यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात गत दोन वर्षात फक्त दोन बालके एचआयव्ही ग्रस्त आढळली आहेत. एचआयव्ही होण्याची असुरक्षित शारीरिक संबंध,दूषित सुई,दूषित रक्त,आणि गर्भवती मातेपासून तिच्या बाळाला होणारा संसर्ग ही प्रमुख कारणे आहेत . एकदा एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीची लागवन झाली की त्याला उपचार शिवाय दुसरा कोणताही मार्ग उरत नाहीत एचआयव्ही बरा होऊ शकत नसला तरी पुढील आयुष्यात त्याला होणारे संबंधीत आजार निश्चित टाळता येऊ शकतात यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना राबविल्या जातात मध्यंतरी मातेपासून बाळाला होणारे एचआयव्ही प्रमाण वाढले होते या गोष्टींचा विचार करून शासनाने जनजागृतीचे उपक्रमांमध्ये वेग आणला.
गर्भवती महिलांचे योगदान मोलाचे :- बुलडाणा जिल्ह्यात एकही एचआयव्ही ग्रस्त बाळ जन्माला न येन हे कार्यक्रमाचे यशाचं म्हणावे लागेल मात्र यामध्ये प्रत्येक गर्भवती महिलेचे योगदान महत्वाचे आहे तिच्या संमतीशिवाय एचआयव्ही चाचणी करणे अशक्यच होते .जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली एचआयव्ही तपासणी शिबिरे घेण्यात आली .त्यामुळेच जिल्ह्यात जागृती निर्माण होऊ शकली आज जिल्हा एचआयव्ही निर्मूलन कडे वाटचाल करीत आहेत .आणि त्यांच्या या कार्याला यश सुद्धा मिळत आहेत.प्रत्येक गर्भवती महिलेचे स्वतःहून पुढे येत एचआयव्ही चाचणी करून घेने आवश्यक आहे त्या ठिकानी एआरटी उपचार देण्यात येतो.आणि यामुळेच देशातील प्रत्येक जिल्हा हा एड्स मुक्त होऊ शकेल…