बुलडाणा : शेतकऱ्यांचा शेतमाल असलेला मका पिकाचे खरेदी साठी अजूनही बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे ते सहाशे रूपयाने नुकसान सहन करावे लागत आहे त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी राज्य सरकार च्या विरोधात चिखली च्या आमदार श्वेता महाले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.सरकार ने जिल्ह्यातील मका व तुरीचे खरेदी केंद्र सुरू करून त्वरित हमीभावाणे ह्या पिकांची खरेदी करावी व कापसाचे देखील उर्वरित शेतकऱ्यांचे चुकरे पूर्ण करावे यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे तर सरकार ने त्वरित केंद्र सुरू करावे अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
previous post
next post