जुनी पेन्शन योजनेच्या मागणीकरिता केले अभिनव आंदोलन..
बुलडाणा:अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पारिभाषिक पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी २१ सप्टेंबरला जिल्हामुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरात ‘बाईक रॅली’ काढण्यात आली. शहरतील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीने बुलडाणेकरांचे लक्ष वेधले.अंशदायी योजना अन्यायकारक असून त्याऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य महसूल कर्णाचारी, जिल्हा परिषद महासंघ, ग्रामसेवक युनियन, तलाठी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कृषी सहायक आदी संघटना संघर्ष करीत आहे. मागील १९ जानेवारी २०१९ ला राज्याचे तत्कालीन अर्थ राज्य मंत्री यांनी अभ्यास समिती गठीत केली होती. मात्र साडेतीन वर्षे उलटूनही काहीच कारवाई न झाल्याने अखेर 21 सप्टेंबरला बाईक रॅली हे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते