बुलडाणा : जम्मू काश्मिर राज्यात बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर या ठिकाणी कार्यरत असताना आतंकवाद्यांनी पेट्रोलिंग पार्टीवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला प्रत्युतर देताना जिल्ह्यातील पातुर्डा ता. संग्रामपूर येथील सीआरपीएफचे जवान चंद्राकांत भगवंतराव भाकरे हे 18 एप्रिल 2020 रोजी शहीद झाले. राज्य शासनामार्फत शहीद जवानांच्या अवलंबितांना द्यावयाच्या मुख्यमंत्री कारगिल निधीमधून 50 लक्ष रूपये आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते वरपत्नी मनिषा चंद्राकांत भाकरे, वीरपिता भगवंतराव नारायण भाकरे, वीरमाता निर्मलाबाई भगवंतराव भाकरे यांना प्रदान करण्यात आला.