रात्री पर्यंत पोहोचू शकते पार्थिव
संग्रामपूर : जम्मू काश्मिरमधील बारामुल्ला जिल्हयातील सोपोर येथे दहशतवाद्यांशी लढतांना केंदीय राखीव पोलीस दलाचे तीन जवान शहीद झाले , ज्यामध्ये एक जवान महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्याचा आहे. या जवानावर आज रात्री शासकीय इतमामात अंतिम संस्कार केला जाणार आहे.
संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील ३८ वर्षीय चंद्रकांत भगवंतराव भाकरे हे जवान आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असतांना आतंकवाद्यांच्या चकमकीत शहिद झाल्याची घटना १८ एप्रिलरोजी संध्याकाळी घडली. ही माहिती कळताच संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली, या जवानांचे पार्थिव औरंगाबाद पर्यंत हेलिकॉप्टर ने येणार असून तेथून अंबुलन्स ने त्यांच्या मूळ गावी पातुर्डा येथे आज रात्री ८ वाजे च्या सुमारास येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. शहीद जवान यांचे कुटुंब हे पुण्यात राहत असून ते सकाळी गावी पोहोचले आहेत या जवानांवर अंतिम संस्कार करण्याची तयारी पूर्ण झाली असून आता त्यांचे शव येण्याची वाट पाहत आहेत, शहीद जवान यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी एक मुलगा एक मुलगी आई-वडील असा मोठा आप्त परिवार आहे.