२१ हजाराच्या दारूसह पिकअप जप्त ; चालक ताब्यात
खामगाव:-अवैधरित्या दारु घेवून जाणारी महिंद्रा पिकअप शहर पोलिसांनी पकडली असून २१ हजाराच्या दारुसह सदर वाहन जप्त करण्यात आले आहे .मिळालेल्या गुप्त माहितीवरुन शहर पोलिसांनी नांदुरा रोडवरील फॉरेस्ट ऑफीस नजीक महिंद्र पिकअप क्र .एमएच २८ एबी ५४२६ ला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दारु आढळून आली.
यावेळी पोलिसांनी पिकअप चालक युवराज ज्ञानेश्वर सोनवणे ( २ ९ ) रा .शमळदे ता . मुक्ताईनगर जि.जळगाव खा.याला ताब्यात घेवून २१ हजाराच्या दारुसह सदर महिंद्रा पिकअप असा एकूण २,२३,३६० रु.चा मुद्देमाल जप्त केला . याप्रकरणी चालक सोनवणे यांच्याविरुध्द कलम ६५ ( ई ) मप्रोका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .