April 11, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा

शहरात चौकाचौकात मोकाट जनावरांचा हैदोस

खामगांव : शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, रस्त्यांवरील वाहनचालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते.रस्त्यांवर आपली गुरेढोरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुध्द नगर परिषद ने कडक कारवाई करण्याची गरज आहे. मात्र या समस्येपासून नागरिकांनी सुटका करण्यात नगर परिषद अशी कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसत आहे.शहराती नेहमीच वर्दळ असलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाटे जनावरे कळपा -कळपाने फिरत आहेत तर रस्त्याच्या मध्यभागी थांबून रस्त्यावर बसत आहेत.

यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. काही रस्त्यावर अचानकपणे हे मोकाट जणावरे रस्ता ओलांडत असल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत. तर वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याने नागरिक संतापले आहेत.अत्यंत वर्दळीच्या अग्रसेन चौक परिसरात कळपच्या कळप मोकाट जनावरे फिरताना दिसून येतात .तर नांदुरा रोडवर गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचे वास्तव्य वाढले आहे. रस्त्यात बसलेली जनावरे डोकेदुखीच ठरत आहे. स्थानिक नगरसेवकांनी आपल्या परिसरातील अशा समस्या सोडविण्यासठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. नांदुरा रोड,फरशी,टिळक पुतळा रोड सह इतर भागांप्रमाणेच मोकाट जनावरांची समस्या वाढत चालली आहे.

Related posts

जिल्ह्यात आजप्राप्त 301 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 33 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

अण्णा भाऊ साठे नगर म्हाडा कॉलनीत घाणीचे साम्राज्य

nirbhid swarajya

पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर; वर्षभरापासून पशु अधिकारी पद रिक्त

nirbhid swarajya
error: Content is protected !!