खामगांव : शहरातील विवीध समस्यांबाबत बहुजन समाज पार्टी खामगांव विधानसभा क्षेञाचे वतीने मुख्याधिकारी नगर परिषद खामगांव यांना निवेदन देण्यात आले. कृषि उत्पन्न बाजार समिती कंम्पाउन्ड मागील वस्तित दोन दिवसापुर्वी पावसाचे पाणी वाहुन नागरिकांच्या घरामध्ये घुसुन घरांचे नुकसान झाले व वस्तित घाणीचे साम्राज्य निर्माण झाले व दुर्गंधी पसरलेली आहे. नाली बांधकाम करुन पिण्याचे पाण्याकरीता नळ कनेक्शन नागरीकांना मिळणे आवश्यक आहे. या पुर्वी ही विविध भागातील समस्या बाबत बसपा च्या वतीने निवेदने दिलेली आहेत. परंतु आजपर्यंत नागरीकांच्या समस्येबाबत कुठलीही उपाययोजना नगरपरिषद प्रशासनाने केली नाही. याकरीता बसपाच्या वतीने सदर निवेदन देवुन नागरिकांच्या भेडसावत असलेल्या समस्या त्वरीत न सोडविल्यास लोकशाही मार्गाने नगरपरिषद प्रशासन विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात नमुद आहे. निवेदनावर बसपा पदाधिकारी गोपाल मेश्राम संयोजक खामगांव, सोपान सावरकर झोन प्रभारी, अँड.डी.एम. भगत. जि.प्रभारी,आबाराव हिवराळे वि.स. प्रभारी, दिपक वानखडे जि.सचिव, अमोल गव्हांदे बिविएफ जि.संयोजक. प्रकाश सावळे वि.स. कोषाध्यक्ष. शहर अध्यक्ष विजय वाघमारे, शहर सचिव विजय शिंदे, प्रफुल्ल चव्हाण व परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत.
previous post
next post