खामगांव किराणा असोसिएशनचा निर्णय
खामगाव : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता खामगांव येथील किराणा असोसिएशनची आज सकाळी बारादरी येथे किराणा असोसिएशन चे अध्यक्ष किशोरभाई गणात्रा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व किराणा शहरातील व्यावसायीक ,व्यापारी यांच्या उपस्थिती मध्ये बैठक घेण्यात आली.कोरोना पेशंट चा खामगांव मधे वाढता आकडा पाहता या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला,की दर शनिवारी व रविवारी सर्व किराणा दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व किराणा दुकानदारांना सोमवार ते शुक्रवार या दिवशी किराणा दुकाने उघडने बाबत व कोरोना काळात आपल्या दुकानांवर सर्व प्रकारच्या अटी व नियमांचे पालन कश्या प्रकारे करायचे याची माहिती सुद्धा देण्यात आली.किराणा उघडण्याचा वेळ सकाळ पासून संध्याकाळी 5 पर्यत दुकाने सुरू ठेवण्यात यावे हा पण निर्णय घेतला अशी माहिती किराणा असोसिएशन च्या वतीने देण्यात आली.