खामगाव : खामगाव बनावट कागदपत्रे आणि स्टॅम्पद्वारे परस्पर प्लॉटची खरेदी-विक्री प्रकरणात खामगाव येथील व्यावसायिक प्रदीप राठी याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला.तब्बल १८ महिन्यांनंतर मिळणाऱ्या जामिनासाठी २० लक्ष रुपयांचा भरणा करण्यासोबतच खामगावात येण्यास बंदीदेखील घालण्यात आली.टेंभूर्णा शिवारातील तब्बल १४ पेक्षा अधिक भूखंडांची बनावट दस्तऐवजाच्या आधारे व्यावसायिक प्रदीप राठी याने खरेदी आणि विक्री केली.हा प्रकार निदर्शनास आल्यावर अंजु लवलेश सोनी यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी प्रदीप राठी विरोधात भादंवि विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.त्यानंतर शहर पोलिसांनी प्रदीप राठी याला अटक केली.दरम्यान,तब्बल १८ महिन्यांपेक्षा अधिक काळ अटक असलेल्या प्रदीप राठी याला मंगळवारी नागपूर खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला.२० लक्ष रुपयांचा भरणा करण्याच्या अटी व शर्तीसोबतच खामगाव येण्यास बंदी घालण्यात आली.न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या एकलपीठाने हा निर्णय मंगळवारी दिला.