खामगाव : स्थानिक ह्दयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. राहुल सदानंद खंडारे व डॉ. दिशा राहुल खंडारे यांच्या व्दारका हॉस्पीटल व क्रिटीकल केअर सेंटर मुकुंद कॉम्पलेक्स, कॅनरा बँकेच्या बाजुला नांदुरा रोड येथे रविवार २४ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत निशुल्क रोग निदान व उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात ह्रदयरोग, मधुमेह, अर्धांगवायू, फिट, मेंदूचे आजार, थायरॉईड, मुत्रपिंडाचे आजार, पोट व यकृताचे आजार, रक्तपेशीचे आजार, दमा, क्षयरोग, फुफ्फुसाचे आजार, संधीवात यासह सर्वप्रकारच्या संसर्गजन्य आजाराचे निदान व उपचार मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गरजु रुग्णांनी नाव नोंदणीसाठी मो.न. ८०१०९११८२८ वर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क करावा, तसेच शिबिरात वेळेवर येणा-या रुग्णांची सुध्दा तपासणी करण्यात येणार आहे. गरजुंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. राहुल खंडारे यांनी केले आहे.
next post