चिखली : काल ४ जून रोजी मलकापूर पांग्रा येथे जनमित्र अमोल उईके यांना डी.पी. मध्ये फ्युज टाकत असतांना तेथे नवाजखा अयुबखा पठाण याने वाद घालून शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या गाडीचे नुकसान सदर बाब वितरण केंद्र प्रमुख अभियंता देवर यांना कळताच त्यांनी जवळील पोलीस स्टेशन साखरखेर्डा येथे माहिती दिल्याने पोलीसांनी नवाजखा अयुबखा पठाण याला अटक केली. त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास अमोल अंबादास उईके यांना डीपी वर नवाजखा अयुबखा पठाण हे डी.पी. चा नुकसान करत असल्याचे कळविले. त्यामुळे अभियंता देवर हे कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी नवाजखा अयुबखा पठाण यांनी अमोल अंबादास उईके सह सर्वांना धक्कामुक्की व शिवीगाळ करून लाईट चालू केल्यास जीवाने मारण्याची धमकी दिली. सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन ला देऊन आरोपी नवाजखा अयुबखा पाठन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.
ReplyForward |