January 4, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

वीज चोरी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव : तालुक्यातील पिंपळगाव राजा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत येणाऱ्या कवडगाव येथे तर शेगाव ग्रामीण वीज वितरण केंद्र अंतर्गत येणाऱ्या टाकळी धारव येथे अवैधरित्या लघुदाब विद्युत वाहिनी वर टाकून वीज चोरी केल्याची दोन घटना उघडकीस आल्या. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित उपविभाग कनिष्ठ अभियंता पिंपळगाव राजा गजानन देशमुख यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आले आहे की तालुक्यातील कवडगाव येथे वीज चोरीची मोहीम सुरू असताना विजय प्रल्हाद राठोड यांच्या घरी 8 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास विद्युत वितरण कंपनीचे पथक पथकाने छापा टाकला असता घराजवळ असलेल्या महावितरण विद्युत कंपनीच्या लघुदाब वाहिनीवर अवैधरीत्या अकोला टाकून विजेची चोरी करताना आढळून आला त्याने जवळपास 378 युनिट ची किंमत 5 हजार 213 रुपयाची वीजचोरी केली. तर दुसर्‍या घटनेत शेगाव तालुक्यातील विद्युत कंपनीचे कनिष्ठ अभियंता संदीप विश्वनाथ ढोले शेगाव ग्रामीण वीज वितरण केंद्र यांच्या पथकाने टाकळी धारव येथे तीन मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास छापा मारला असता रामदास शिवराम चव्हाण हा घरा नजीकच्या लघुदाब वाहिनीवर अंदाजे 25 फूट लांब असणाऱ्या काड्या रंगाच्या सर्विस वायर ने आकडे टाकून विजेची चोरी करताना पथकाला मिळून आला तर त्यांनी सहा महिन्यात 854 युनिट्स ची किंमत 9560 रुपयाची विजेची चोरी करताना आढळून आला तरी या प्रकरणी कनिष्ठ अभियंता पिंपळगाव राजा गजानन जानराव देशमुख व शेगाव ग्रामीण वीज वितरण केंद्र कनिष्ठ अभियंता संदीप ढोले यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विजय प्रल्हाद राठोड व रामदास शिवराम चव्हाण यांच्याविरुद्ध भादवि कलम 135 भारतीय विद्युत कायदा 2003 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत

Related posts

इलेक्ट्रिशन प्लंबर असोसिएशन खामगांव तर्फे वृक्षारोपण

nirbhid swarajya

जिल्ह्यात प्राप्त 376 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 184 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

दोन गटात तुफान हाणामारी ; २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya
error: Content is protected !!