खामगांव : गेल्या आठवडाभराच्या उसंती नंतर मंगळवारी रात्री एक वाजेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मात्र सकाळच्या सुमारास हवेच्या व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला.
खामगाव मधील गोपाळ नगर भागातील विद्युत पोल वर वीज कोसळल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने गोपाळ नगर भागातील इलेक्ट्रिक पोल वर विज कोसळली.
यामध्ये त्या भागात राहणारे शुभम मोरे, काटे, मिरगे, कुकडे, देवकर यांच्यासह अनेक नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रिक सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्युत पोल वर वीज कोसळल्याने नागरिकांच्या घरातील लाईट, वायरिंग, फ्रिज,पंखे, टीव्ही, फॅन इत्यादी विजेचे साहित्य जळाले आहेत. वीज कोसळल्याने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. तात्काळ याचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गोपाळ नगर भागातील नागरिकांकडून होत आहे.