April 19, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

विहिरीत आढळला युवक- युवती चा मृतदेह!

खामगाव : तालुक्यातील भालेगाव बाजार येथील ११ ऑक्टोंबर पासून बेपत्ता असलेले युवक व युवती पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव राजा नजीकच कृषी उत्पन्न उपबाजार समिती जवळच असलेल्या विहिरीत मिळून आला. दिनांक १३ ऑक्टोंबर रोजी विठ्ठल मधुकर पाटील हे सकाळी शेतात पाणी काढायला गेले असता युवक व युवती चा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीश आडे पोलीस उपनिरीक्षक मोहन हिवाळे व सहकारी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. बुधवारी सायंकाळच्या दरम्यान मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील भालेगाव बाजार येथील युवक सुरेश रामदास भांबळकर व युवती दुर्गा समाधान सावरकर या दोघांचे मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आले होते. या घटनेसंदर्भात पंचक्रोशीतील गावकऱ्यांमध्ये तर्क-वितर्क लावण्यात येत आहे. या घटनेची सखोल तपास पोलिसांनी करावी अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिक करत आहे. युवक युवती दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येथे करण्यात आली होते. घटनास्थळाचा बाजूला अपघात झालेली विना नंबर दुचाकी दोन दिवसांपासून पडलेली होती. या दुचाकी बद्दल गावकऱ्यांनी माहिती पोलीस स्टेशनला दिली होती. युवक-युवतीचा मृतदेह विहिरीत असल्याची माहिती मिळताच जवळपासच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सतीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन हिवाळे व ए एस आय प्रवीण सिंह ठाकुर .पोका मंगल सिंह चव्हाण व विनोद भोजने करत आहे.

Related posts

चारचाकी वाहनाचा अपघात ३ जखमी ; १ मृत्यु

nirbhid swarajya

वरवट बकाल येथील ज्वेलर्स ची 3 दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी..चोरट्यांचे तामगाव पोलीसांपूढे आव्हान !

nirbhid swarajya

बुलढाणा उपजिल्हाधिकारी, लिपिक व एका वकिलाला एक लाखाची लाच स्वीकारतांना बुलडाणा एसीबी जाळ्यात…

nirbhid swarajya
error: Content is protected !!