खामगांव : राज्यात एस टी कर्मचार्यांच्या संपाचा आज १२ दिवस असून राज्य सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये अद्याप पर्यंत कुठलाही तोडगा या संपाबाबत निघालेला नसताना आता कर्मचारी आत्महत्येच्या दिशेने वळत असल्याचे दिसून येत आहे. एसटी विभागाने कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे धोरण अवलंबत अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित केले असताना आपल्यावरही निलंबनाची पाळी येईल या भीतीपोटी खामगाव एसटी आगारामध्ये सहाय्य्क मेकॅनिकल म्हणून काम करणाऱ्या विशाल अंबलकर नामक कर्मचाऱ्याने दोन दिवसापूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये अकोला येथील रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना काल रात्री ९ वाजताच्या दरम्यान सदर कर्मचारी यांची प्राणज्योत मालवली. जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्याची या पहिल्या आत्महत्या मुळे जिल्ह्यातील आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एस टी कर्मचारी आंदोलनामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २०० च्या जवळपास कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. कारवाईचे सत्र एस टी महामंडळाकडून सुरू असताना आपल्यावरही निलंबनाची पाळी येईल या भीतीपोटी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी असलेले खामगाव एसटी आगारातील सहाय्यक मेकॅनिकल म्हणून काम करणाऱ्या विशाल प्रकाश अंबलकर या कर्मचाऱ्याने दोन दिवसापूर्वी माटरगाव येथील आपल्या घरात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान त्यांना सुरुवातीला खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर अकोला येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते. दोन दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक बनलेली होती. मात्र काल उपचारादरम्यान रात्री ९ वाजताच्या त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी अंबलकर यांचा मृतदेह त्यांच्या गावी आणण्यात आला आहे. यानंतर जिल्हाभरातील एसटी कर्मचारी माटरगाव या गावात पोहोचले होते. राज्यभरात आतापर्यंत ४० च्या वर आत्महत्या झालेल्या असताना बुलढाणा जिल्ह्यात एस टी कर्मचाऱ्यांची ही आत्महत्या असल्याने आता आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.