शेगांव : शेगांव तालुक्यातील जलंब येथील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले मृतक पोकॉ उमेश शिरसाठ यांना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टीप्पर चालकाने टीप्पर अंगावर टाकून ठार केल्याच्या घटनेने त्या घडलेल्या घटनेमुळे पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा एकच खळबळ उडाली होती तर या गंभीर घटनेची दखल घेऊन सखोल चौकशी करण्याकरिता अमरावती येथील विशेष पोलिस निरीक्षक रानडे यांनी ३ मे रोजी दुपारी बारा वाजता जलंब येथील पोलीस स्टेशनला भेट दिली. सर्वप्रथम ज्या ठिकाणी अवैध रेती वाहतूक करणार्या टिप्पर चालकाने टिप्पर अंगावर टाकून पोकॉ सिरसाठ यांना ठार केले त्या माटरगाव रोड वरील घटना स्थळावर विशेष पोलीस महानिरीक्षक रानडे यांनी स्वतः जाऊन घडलेल्या घटनेची पाहणी केली त्यानंतर जलंब पोलीस स्टेशन मध्ये आले असता पोलीस कॉन्स्टेबल उमेश सिरसाठ यांचा मृत्यू कसा झाला याबाबत एस पी हेमराजसिंह राजपूत, डीवायएसपी प्रदीप पाटील, ठाणेदार पांडुरंग इंगळे, पी एस आय राहुल काकडे यांच्या उपस्थितीत पोकॉ मृतक उमेश शिरसाठ यांच्या झालेल्या मृत्यूबाबत गांभीर्याने लक्ष घालून सखोल चौकशी केली या घटनेबाबत यापुढे असले घडलेले प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा सुद्धा दिला असल्याचे समजते.
previous post