मुंबई-: जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची पदोन्नती रखडली होती. आता राज्य शासनाने त्यांना विशेष अधिसूचनेच्या माध्यमातून विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती दिली आहे. मात्र अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही.भुजबळ यांना २०१० च्या निवड सूचीप्रमाणे सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात आली आहे. अधिसूचना न निघाल्याने भुजबळ पाटील पोलिस अधीक्षक म्हणूनच कार्यरत होते. मात्र, आता शासनाच्या अधिसूचनेनुसार त्यांना एकाचवेळी सर्व पदांची पदोन्नती देण्यात आली.