April 19, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

विविध मागण्यासाठी भाजपा कडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

खामगांव : संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजार व बागायतदारांना हेक्टरी 75 हजाराची मदत द्या, तसेच पोलिसांना मारहाण करणाऱ्या यशोमती ठाकूर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अश्या मागणीचे निवेदन आज भाजपच्या वतीने उपविभागीय अधिकारी जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री ना देण्यात आले .खामगाव तालुक्यात सन २०२० च्या खरीप हंगामाची पेरणी साधारणपणे जुन/जुलै मध्ये झाली. तेव्हा पासुन आजपर्यंत पावसाने सर्व विक्रम मोडीत काढत शेतकऱ्यांचे फार मोठे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक संकटांना शेतकरी तोंड देत आहे. मुग, उडीद, कपाशी, मका, सोयाबीन, ईत्यादी नगदी पिके शेतकऱ्यांच्या हातुन पुर्णपणे गेली आहेत. अशातच आता परतीचा पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकरी पुर्णपणे देशोधडीला लागला आहे. तेव्हा सर्व शेतकरी बांधवांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तसेच फळबाग शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रूपयांची त्वरीत मदत जाहीर करावी, पंचनामे व दौरे न करता मदत जाहीर करावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला असेल, नसेल, त्याही शेतकऱ्यांना मदती सोबत पिक विमा त्वरीत मंजुर करून मदत द्यावी जेणेकरून शेतकरी मरणाची वाट पाहणार नाही.

शेतकरी कोरोणा संकट, आणी अस्माणी सुलताणी संकटात सापडला आहे कुषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेची सबसीडी लवकर देऊन तसेच त्या योजनेचा लंक्षांक वाढवून द्यावा मागचे वर्षीचे सोयाबीन वरील बोनस लवकरात लवकर द्यावे, मागच्या वर्षीचा पिक विमा बाकी असेल त्यांना त्वरीत अदा करावा, कापूस फेडरेशन चालु करावे, तसेच ऑनलाईन खरेदी करीता असलेली नोंदणी रद्द करून सरळ सरळ नोंदणी करावी, ज्या शेतकऱ्यांचे पिक विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा केले असतील ते पैसे बचत खात्यात टाकावे व शेतकऱ्यांना त्वरीत मदत देण्यात यावी तसेच पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांना मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा या निवेदनाद्वारे भाजपच्या वतीने करण्यात आली.यावेळी यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, नगराध्यक्षा सौ अनिताताई डवरे, संजय शिनगारे, शांताराम बोधे, संजय ठोंबरे, जि प सदस्य डॉ गोपाल गव्हाळे, महेंद्र रोहनकार, न प आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार, प स सदस्य राजेश तेलंग, नगरसेवक सतीशअप्पा दुडे, जितेंद्र पुरोहित, बळीराम लहुडकार, दत्ता पाटील, विजय महाले, मुन्ना दळी, राजेश शर्मा, युवराज मोरे, मुकुंदा उमाळे, देवानंद इंगळे, नंदकिशोर गुरव, जानराव इंगळे, गजानन गाडे, संतोष वाघ, आदी भाजप चे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

.

Related posts

अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

nirbhid swarajya

काळ्याबाजारात जाणारा रेशन तांदुळ पकडला

nirbhid swarajya

जय किसान कृषि संचालकाची 25 लाखाची बॅग लंपास

nirbhid swarajya
error: Content is protected !!