खामगांव: विनापरवाना शस्त्र व हत्यार बाळगणार्या दोघांना खामगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६ मे रोजी कोम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान आरोपी नारायण सीताराम पवार वय ६९, शांताराम नारायण पवार वय २६ रा.अंत्रज फाटा यांची घराची झडती घेतली असता घरातून दोन गावठी पिस्तूल किंमत अंदाजे ५० हजार रुपये व ९ जिवंत काडतुस किंमत २७०० रुपये दोन तलवारी किंमत २ हजार रुपये असा एकूण ५४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खामगांव ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार रफिक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नारायण सिताराम पवार व शांताराम नारायण पवार या दोघांविरुद्ध कलम ३/२५, ४/२५ भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्याकडे देण्यात आला आहे
previous post