April 17, 2025
खामगाव जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र राजकीय विदर्भ शेगांव

विनायकराव मेटे साहेबांच्या अपघाताची चौकशी करा :- मराठा संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन….

नांदुरा: मराठा समाजाचे नेते स्व.श्री. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी मराठा संघटनांनी निवेदनाच्या माध्यमातून केली.याबाबत सविस्तर असे की मराठा समाजाचे नेते तथा मराठा समाजासाठी अहोरात्र झटणारे आणि आरक्षणासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणारे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष मा.आमदार स्व. विनायकराव मेटे साहेब यांचा अपघात नसून घातपात आहे. साहेबांचा अपघात हा संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ते कारवाई करावी. त्याचबरोबर अपघात झाल्यानंतर मेटे साहेबांना वेळेवर कोणत्याही सोयीसुविधा न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला वेळेवर सोयीसुविधा जर पुरवल्या गेल्या असत्या तर नक्कीच त्यांचा जीव वाचला असता अशा प्रकारच्या अनेक संशयामुळे त्यांचा अपघात झाला नसून त्यांचा घातपात करण्यात आला आहे असा सूरही मराठा समाजाचा आहे. या अपघाताची योग्य ती चौकशी करून सबंधितांवर योग्य ती कारवाई करावी या आशयाचे निवेदन मराठा महासंघ,मराठा पाटील युवक समिती, शिवमुद्रा संघटना,मराठा क्रांती मोर्चा,शिवछावा संघटना व समस्त मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक २३ ऑगस्ट २०२२ रोजी नांदुरा तहसील मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांना देण्यात आले.यावेळी बाळासाहेब चांभारे पाटील,छोटू पाटील ,प्रकाश खंडागळे, ज्ञानेश्वर पाटील,विजय पाटील,शंकर कोळस्कार,लक्ष्मण वक्टे,सतीश लांजुळकर, पन्ना पाटील,रामकृष्ण कुटे,निंबाजी पाटील,वैभव खराटे,शरद पाटील,अमर पाटील भगिरथ मनस्कार,श्रीकृष्ण मनस्कार,भागवत मुंढे,राहुल मुंढे,निंबाजी बाठे,अरविंद बाठे,प्रफुल्ल बिचारे,प्रकाश खंडागळे,भगवान धांडे,संतोष डीवरे,बलदेवराव चोपडे सलीम पेंटर व इतर

Related posts

जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

nirbhid swarajya

शेगाव शिवसेना तालुक्याच्या वतीने व्यंकय्या नायडू यांचा निषेध

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 1235 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 129 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!