January 4, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा

विनापरवाना दारू घेऊन जाणाऱ्या दोघां विरूध्द कारवाई

खामगाव : शहरातून एमआयडीसी कडून पारखेड मार्गे नांदुरा कडे दुचाकीवर देशी दारू घेऊन जाताना उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने २ जुलै रोजी सकाळच्या सुमारास दोघांना पकडले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातिल ना.पो.कॉ.रविंद्र कन्नर व पो. ना.देवेंद्र शेळके हे एमआयडीसी भागात पेट्रोलिंग करत असताना पेट्रोलिंग दरम्यान MH- 28- 4013 या दुचाकीवर सागर भागवत भिडे व विजय बाबुराव भिडे दोघेही रा. शेंबा ता.नांदुरा हे दोघे संशयीतरित्या जात होते. जेव्हा पोलिसांनी त्यांची चौकशी केली त्यावेळी यांच्या जवळील दुचाकीवरील पोत्यामध्ये देशी दारू बॉक्स आढळून आले, त्यामध्ये एकूण 10 हजार 400 रुपये किमतीची दारू व 40 हजार दुचाकी असा एकूण 50 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असुन दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये हे कलम 65 (अ)(ई) मुदाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास शिवाजी नगर पोलिस करीत आहे.

Related posts

मुलगी वाचली पण आई गेली…

nirbhid swarajya

बलात्कारातील आरोपी कारागृहातून फरार

nirbhid swarajya

तालुक्यातील शेतकरी सुखावला आता येणार पेरणीला वेग

nirbhid swarajya
error: Content is protected !!