April 19, 2025
गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

विनापरवानगी ते वृक्ष कापणारा डिजिटल फलक व्यावसायिक

बुलडाणा : २२ मार्च रोजी सकाळी च्या सुमारास बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौक येथील तीन वृक्ष विनापरवानगी कापण्यात आले होते. ते वृक्ष बुलडाण्यातील डिजिटल फलक व्यावसायिकाने कापण्यात लावल्याचे समोर आले आहे.कैलास पसरटे असे डिजिटल फलक व्यवसायीकाचे नाव असून ते नगर परिषदेकडून वार्षिक करारनाम्यानुसार शहरात डिजिटल फलक लावण्याचे व्यवसाय करतो. डिजिटल फलकाला अळथडा निर्माण झाल्याने हे तिन्ही वृक्ष कापल्याचा प्रथमदर्शनी समोर आल्याचे पोलिसांनी संगितले आहे.प्रकरणी वृक्ष कापल्याचा गुन्ह्यात कैलास पसरटे यास मुख्य आरोपी म्हणून समावेश केला आहे. २२ मार्च रोजी बुलडाण्याच्या जयस्तंभ चौकात सकळी अज्ञात व्यक्तींनी विनापरवानगी तीन वृक्ष तोडले होते. पर्यावरण प्रेमींच्या सतर्कतेने हे प्रकरण समोर आणल्याने नगर पालिकेचे वृक्ष अधिकारी सुनील बेंडवाल यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती, याप्रकरणी गुन्हे दाखल करून पोलिसांनी झाडे तोडणाऱ्या तीन आरोपी मजूरांना अटक करून तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळवली, या आरोपींना पोलिसांनी विचारपूस केली असता तिन्ही आरोपींना मजुरी देऊन डिजिटल फलक व्यवसायीक कैलास पसरटे यांनी झाडे तोडण्यासाठी सांगितले होते, त्यावरून कैलास पसरटे यांचा दाखल गुन्ह्यात मुख्य आरोपी म्हणून समावेश केला आहेत, तर पसरटे यांनी तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळवल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे, कैलास पसरटे यांचे शहरात बोर्ड,बॅनर फ्रेम आहेत त्याठिकाणी डिजिटल बोर्ड लावण्यासाठी या वृक्षांची अडचण येत असल्याने त्यांनी झाडे तोडल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे नगर परिषदेकडून शहरातील डिजिटल बोर्ड लावण्याचे कंत्राट कुणालाही देण्यात आले नसून कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू.आहे मात्र कोणीही अधिकृत टेंडर भरलेले नाही.त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी शहरातील यापूर्वी कंत्राट देण्यात आलेल्या बोर्ड मालकांना नोटीस देण्यात आल्या असून नियमबाह्य बोर्ड लावल्यास त्यांचे बोर्ड सांगाडा स्टँड जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडू सांगण्यात आले आहे. आणि नियमबाह्य झाडे तोडल्या प्रकरणी कैलास पसरटे यांच्यावर गुन्हा सिद्ध झाल्यास किंवा पोलीस प्रशासनाकडून काही पत्रव्यवहार झाल्यास त्यांना कंत्राटदारांच्या यादीतून ब्लॅक लिस्ट करण्याचे संकेत देखील अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

Related posts

अखिल भारतीय मराठा महासंघ खामगांव शहर जम्बो कार्यकारिणी जाहीर 

nirbhid swarajya

रायगडावर सापडला हा शिवकालीन खजिना

nirbhid swarajya

शेगाव अळसना रोडवरील श्रद्धा रेस्टॉरंट वर डीबी पथकाचा छापा विदेशी दारू जप्त

nirbhid swarajya
error: Content is protected !!