चक्क नवरदेवाच्या गाडीला ही बसला दंड
खामगांव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. यामध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून सार्वजनिक वाहतूक, दुकानं, शाळा, कॉलेज आणि कंपन्या सर्व बंद करण्यात आल्या आहेत. पण असे असतानाही काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. या फिरणाऱ्यांवर खामगांव शहर पोलिासांनी कठोर कारवाई सुरु केली आहे. अशातच आज सकाळी खामगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर आपल्या कर्मचाऱ्यांसोबत येथील गांधी बगीचा समोर वाहने थांबवून त्यांच्यावर कारवाई करत असताना इंडियन आर्मी मधील नवरदेवाची वरात या येथून जात असताना त्या गाडीला थांबवले असतात त्या क्रूजर गाडी मध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी त्यामध्ये बसलेले आढळून आले. यावेळी सदर क्रूजर मध्ये १५ ते १६ जण तर दुसऱ्या क्रूजर गाडी मध्ये १२ ते १३ प्रवासी बसवले होते. यावेळी ठाणेदार नवीन अंबुलकर यांनी सदर वाहन पोलिस स्टेशनला लागून वाहनावर कारवाई केली व आत मधल्या बसलेल्या सर्व प्रवाशांवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन घोषित केला असतानाही काही लोक नियम न पाळत घराबाहेर पडत आहेत. या विनाकारण फिरणाऱ्यांना बऱ्याचदा घराबाहेर न येण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु कुणी ऐकत नसल्याने पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत विनाकारण मोटारसायकलवर फिरणे, मास्क न लावणे यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण नागिरक सरकारच्या सूचनांचे पालन करत नसल्याने दिसत आहे. त्यामुळे अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे.