खामगांव : अभाविप महाराष्ट्रभर विविध विद्यापीठांचे कुलगुरू, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार व पालकमंत्री यांना भेटून कार्यकर्ते विद्यार्थ्यांचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र भर मांडत आहे. याच पार्श्वभूमीवर २६ ऑगस्ट २०२० रोजी अभाविप धुळे शाखेचे कार्यकर्ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांची भेट पालकमंत्री यांनी टाळली. म्हणून विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी पालकमंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस प्रशासनाने अमानुषपणे लाठीमार व बुक्यांचा मारा केला हया घटनेचा भाजयुमो व विद्यार्थीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी मागण्यासाठी आज तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. कोरोना विषाणू (कोव्हीड -१९) च्या प्रादुर्भाव व त्यामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील सर्व क्षेत्रावर दुरगामी परिणाम झाला आहे व त्याला शिक्षणक्षेत्र देखील अपवाद नाही. मागील पाच महिन्याच्या काळामधील शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कोरोना महामारीमुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. परंतू विद्यार्थ्यांकडून या सत्राचे परीक्षा शुल्क घेण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३०% कपात करण्यात यावी.सरासरी च्या सूत्रामुळे चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेल्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे.नवीन शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून एकूण शैक्षणिक शुल्काच्या जास्तीत जास्त १५% शुल्क घेऊन प्रवेश देण्यात यावा व उर्वरित शैक्षणिक शुल्क चार टप्प्यात घेण्यात यावे. स्वायत्त (खाजगी) विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्काच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय शुल्क नियंत्रण समिती गठित करण्यात यावी. हया मागण्यांचा हया निवेदनात समावेश आहे.
या प्रश्नांना घेऊन अभाविप महाराष्ट्रभर विविध विद्यापीठांचे कुलगुरू, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार व पालकमंत्री यांना भेटून कार्यकर्ते विद्यार्थ्यांचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र भर मांडत आहे. याच पार्श्वभूमीवर २६ ऑगस्ट २०२० रोजी अभाविप धुळे शाखेचे कार्यकर्ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांची भेट पालकमंत्री यांनी टाळली. म्हणून विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी पालकमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस प्रशासनाने अमानुषपणे लाठीमार व बुक्यांचा मारा केला हया घटनेचा भारतीय जनता युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करते व तसेच यावेळी पोलिसांनी निर्दयी पणे लाठीमार व बुक्यांचा मारा विद्यार्थ्यांवर केला त्यावेळी आलिशान कार मध्ये बसून बघ्याची भूमिका घेणाऱ्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे वचन देऊन नापास करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी करते. तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वरिल समस्या तात्काळ सोडवाव्यात, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असे ही भाजपाचे महाराष्ट्र सोशल मिडीया प्रश्चिम विदर्भ संयोजक सागर फुंडकर म्हणाले.
यावेळी सागर फुंडकर यांचेसह,राकेश राठोड (राणा), राम मिश्रा,रुपेश खेकडे, पवन गरड, राजकिरण पाटील,नगेंद्र रोहणकार, यश (गोलू) आमले, विक्की हटटेल,श्रीकांत जोशी, सोनू नेभवाणी,संदीप त्रिवेदी, संजय भागदेवाणी, हितेश पदमगीरवार,भावेंद्र दुबे, प्रसाद एदलाबादकर,विनोद थानवी,पवन राठोड, प्रतिक मुंढे पाटील, रोहन जैस्वाल, रवि गायगोळ, चंदु भाटीया, विकास चवरे, प्रितम चव्हाण,विकास हटकर,ॲड.दिनेश वाधवाणी, गजानन मुळीक, संतोष येवले, गणेश कोमुकर, संदीप देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.