January 4, 2025
आरोग्य बातम्या बुलडाणा

विदर्भात कोरोनाचा पहिला बळी बुलडाण्यात

संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरु

 बुलडाणा : कोरोना व्हायरसने आता देशात चांगलेच हातपाय पसरले आहेत. त्यातही राज्यातील परिस्थिती आणखी भयंकर होत चालली आहे. कारण आता राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दोनशेच्या जवळ पोहचली असून बुलडाणाकरांसाठी धोकादायक आणि धक्कादायक बातमी समोर आलीय या जिल्ह्यातही एका रुग्णाचं रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या रुग्णाने काल शनिवारी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयाच्या आयशोलेशन वॉर्डात अखेरचा श्वास घेतला हे विशेष आहे.


मृत कोरोना रुग्ण हा न्यूमोनिया झाला म्ह्णून भरती झाला होता आणि त्याच्यावर उपचार सुरु होते. रुग्णाचा रिपोर्ट पॉझेटीव्ह येताच प्रशासनाने रुग्णाचे नातेवाईकांची तपासणीसाठी त्यांचे घर गाठले असून सर्वाना कोरोनटाईन करण्यात येणार आहे. तर या रुग्णाच्या जे कोणी संपर्कात आले त्यांचाही शोध घेत असून उल्लेखनीय म्हणजे काल  या रुग्णाच्या  अंत्यविधीमध्ये १०० ते दीडशे च्या जवळपास नागरिक हि उपस्थित होती.  या रुग्णाला बाहेरदेशाची काही हिस्ट्री जरी नसली तरी पॉजिटीव्ह कसा निघाला याचा शोध प्रशासन घेत आहे आणि आता ज्या भागात तो राहत होता त्याठिकाणी सुद्धा सील करण्याचा निर्णय घेणार आहेत. 

शिवाय ज्या रुग्णालयात अगोदर भरती होता त्या रुग्णालयाच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल आणि त्यांना आयसोलेट करण्यात आहेत. बुलडाणा शहर सुद्धा एक्टिव सर्व्हिलन्स मध्ये घेतलेलं आहे तरं बाहेर न निघण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Related posts

SDPO व डीबी पथकातील दोन कर्मचाऱ्याना कोरोनाची लागण; 14 कर्मचारी कोरंटाइन

nirbhid swarajya

जागतिक क्षयरोग दिन साजरा

nirbhid swarajya

Why Bold Socks Are The ‘Gateway Drug’ To Better Men’s Fashion

admin
error: Content is protected !!