खामगाव: तालुक्यातील राहिवासीयांना आज शुक्रवारी वीजेचे तांडव अनुभवयाला मिळाले! तालुक्यातील चितोडा येथील एका शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.गोपाल महादेव कवळे( वय ४० वर्षे) असे दुर्देवी शेतकऱ्याचे नाव आहे.
खामगाव तालुक्यातील चितोडा येथील रहिवासी गोपाल कवळे हे याच तालुक्यातील अंबिकापूर शिवारातील शेतात असताना विज पडून त्यांचा मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथे वीज पडून सात बकऱ्या मृत्युमुखी पडल्या आहे.