खामगांव : विजेचा शॉक लागून एका 14 वर्षीय मुलाचा जागिच मृत्यु झाल्याची घटना रात्री 9 वाजेच्या दरम्यान तलाव रोड भागात घडली.
कोरोनामुळे सर्व लहान मोठ्या गणेश मंडळाने साध्या पद्धतीत गणपतीची स्थापना केली आहे. येथील तलाव रोड भागातील लहान बाल गोपालांनी त्रिमूर्ति ट्रेडर्स चे बुद्धदेव यांच्या वॉल कंपाउंड मधे छोटा गणेश मंडप टाकून गणपती मुर्तीची स्थापना केली आहे. दररोज येथे लहान मुल नवनवीन खेळ खेळत असतात ,आज माधवबाग परिसरात राहणारे बालू खेतान यांचा मुलगा देवेश खेतान वय १४ याने आज संगीत खुर्ची खेळायची म्हणून वायर लावायला इलेक्ट्रिक बोर्डाजवळ वायर लावायला गेला असता त्याला विजेचा जोरदार शॉक लागला. शॉक इतका जोरदार होता कि देवेश चा जागिच मृत्यु झाला. तो बेशुद्ध पडला असावा असे समजून घरातल्यांनी त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांला तपासले असता तो मृत असल्याचे घोषित केले.