वाशीम: वाशीम जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे. चार ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार व ढगफुटीमुळे मालेगाव तालुक्यातील कुत्ताडोह अमानवाडी धम्धमी मुसळवाडी माळेगाव धरमवाडी पिंपळसेंडा रामराव वाडी खडकी मसला पांगरी नवघरे आदी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीतील उभे असलेले सोयाबीन पीक पाण्याच्या प्रवाहामुळे उलटे पडून मुळासकट पालथे झालेले आहे.अनेक जमिनी खरडून गेलेले आहेत.आधीच मेटाकुटीस आलेला बळीराजा या आसमानी व सुलतानी संकटनामुळे अधिकच अडचणीत सापडला आहे.प्रशासनाने या भागात ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी अशी मागणी सर्वसामान्य बळीराजा करत आहे.