April 19, 2025
बातम्या

वार्षिक स्नेह संमेलनात अर्णव देशमुख सन्मानित….


नांदुरा :येथील अर्णव निलेश देशमुख यास  बटरफ्लाय इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित वार्षिक स्नेह संमेलनात वैशिष्ट्यपूर्ण यशाबद्दल  सन्मानित करण्यात आले. वर्ष भरात शाळेच्या वतीने विविध प्रसंगी वेगवेगळ्या  स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये अर्णवचा नेहमी उत्स्फूर्त सहभाग असतो. अभ्यासासोबतच विविध कलागुणांनमध्ये आवड असल्याने उत्तम यशही तो संपादित करतो. नुकत्याच झालेल्या वार्षिक स्नेह संमेलनात देखील अर्णवने पोवाडा, चाईल्ड लेबर, सुनो बच्चों उठावो  बस्ता, मरद मराठा, भांगडापाले या गाण्यांवरील समुहनृत्यांमधून आपला नृत्याविष्कार सादर केला. अॅन्युअल सोशल गॅदरींग, फॅन्सी डे्स  काॅम्पेटिशन व मातीच्या बैलाची सजावट स्पर्धांमध्ये अर्णव ने प्रथम क्रमांक पटकावला. सोलो डान्स काॅम्पेटिशन मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. बेस्ट कि्ष्णा व बेस्ट फार्मर स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. याबद्दल अर्णव देशमुख यास वार्षिक स्नेह संमेलनात प्रेन्सीपल वर्षा झगडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेट वस्तू देवुन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संयुक्ता देशमुख या होत्या. यावेळी प्राची देशमुख, अलका बुरुकले, भाग्यश्री धुरंधर, प्रणाली कोरडे, मंजुषा ठाकरे व संस्थाध्यक्ष अंकुश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.अर्णव देशमुख यशाचे श्रेय गुरुजनवर्ग व कुटुंबीयांना देतो. त्याच्या यशाबद्दल सर्वंनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे….

Related posts

लिकासन ट्रेडर्सचा परवाना रद्द

nirbhid swarajya

नातूच निघाला आजीचा मारेकरी!

nirbhid swarajya

How Good Interior Design Helps Elevate The Hotel Experience

admin
error: Content is protected !!